Maharashtra School Bag Policy: विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी होणार; ‘स्कूल बॅग पॉलिसी २०२०’च्या कठोर अंमलबजावणीची मागणी

दप्तराचे वजन शरीराच्या वजनाच्या १० टक्क्यांपेक्षा अधिक नसावे; वर्गात कपाटांची सुविधा देण्याची पालक संघटनेची मागणी
School Bag Policy
School Bag PolicyPudhari
Published on
Updated on

पुणे: विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्यातील शाळांना ‘स्कूल बॅग पॉलिसी २०२०’ची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयाचे ‘महापेरेंट्स पालक संघटने’ने स्वागत केले असून, या धोरणाची तातडीने आणि कठोरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी संघटनेचे दिलीपसिंग विश्वकर्मा यांनी केली आहे.

School Bag Policy
Sugar Price Drop: साखरेचा मुबलक कोटा जाहीर; दोन दिवसांत दर क्विंटलमागे २०० रुपयांनी घसरले

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन त्यांच्या शरीराच्या वजनाच्या दहा टक्क्यांपेक्षा अधिक असू नये. मात्र, अनेक शाळांमध्ये या नियमाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने विद्यार्थ्यांना जड दप्तराचे ओझे वाहावे लागत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

School Bag Policy
Pune Gram Panchayat Administrator: पुणे जिल्ह्यातील ७२७ ग्रामपंचायतींची मुदत संपली; विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती

शाळांमध्ये तासिकेनुसार वेगवेगळी पुस्तके, वह्या, वर्कबुक, डबा, पाण्याची बाटली, चित्रकलेच्या वह्या आदी साहित्य दररोज ने-आण करावे लागते. त्यामुळे दप्तराचे वजन वाढते. विद्यार्थ्यांच्या शारीरिक हालचालींवरही जड दप्तराचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना दप्तराच्या ओझ्यातून मुक्त करण्यासाठी शाळांनी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

School Bag Policy
Pune Ganeshotsav Medical Hirkani Kaksh Tender: गणेशोत्सवातील वैद्यकीय, हिरकणी कक्षांसाठी महापालिकेचा १.०६ कोटींचा खर्च; विसर्जनाच्या चार दिवस आधी निविदा

वर्गात कपाटांची व्यवस्था करा

विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी वर्गातच कपाटे किंवा साहित्य ठेवण्याची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. मात्र, अनेक शाळांमध्ये अशी सुविधा अद्याप उपलब्ध नसल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी करताना शाळांनी विद्यार्थ्यांना अनावश्यक साहित्य दररोज आणण्याची सक्ती करू नये, अशी मागणीही करण्यात आली आहे.

School Bag Policy
Pune Kurash Fake Certificate Racket: कुराशच्या बनावट प्रमाणपत्रांचे राज्यभर रॅकेट; कोल्हापुरातील पुनगावकर दाम्पत्याला अटक

नियम मोडणाऱ्या शाळांवर कारवाईची मागणी

पालकांनीही मुलांच्या दप्तराच्या वजनाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबत त्यांच्या आरोग्याचाही विचार होणे आवश्यक आहे. शासनाने ‘स्कूल बॅग पॉलिसी २०२०’ची काटेकोर अंमलबजावणी करावी. शासनाच्या निर्देशांचे पालन न करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महापेरेंट्स पालक संघटनेने केली आहे.

राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘स्कूल बॅग पॉलिसी २०२०’ची अंमलबजावणी करावी. अजूनही ज्या शाळांनी दप्तराच्या ओझ्यातून मुक्ताता दिली नसेल, तर त्या शाळांची मान्याता रद्द केली पाहिजे, अशी आमची प्रमुख मागणी आहे.

दिलीपसिंग विश्वकर्मा, महापेरेंट्स पालक संघटना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news