टाइम्स हायर एज्युकेशनच्या वार्षिक क्रमवारीत विद्यापीठ 200 च्या आत आल्याचा आनंद आहे. गेल्या काही वर्षांत विद्यापीठाने सातत्याने संशोधनातील प्रगती, कॅम्पसवरील इनक्युबेशन प्रक्रिया, नवे उद्योजक घडविण्यासाठी पोषक वातावरण, विद्यार्थी व शिक्षकांनी नवीन कंपनी स्थापन कराव्यात यासाठी प्रोत्साहन, तंगज्ञानाचा वापर करून बनविलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने लवचिक अभ्यासक्रम तयार केले आहेत. या सगळ्याचा परिणाम रँकिंगमध्ये दिसतो आहे.– प्रा. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठएशिया युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये पुणे विद्यापीठ 190 व्या स्थानी आहे. मागील वर्षी ते 201 ते 250 मध्ये होते. अध्यापन, संशोधन, ज्ञान हस्तांतरण आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन, या मापदंडावर संस्थांचे परीक्षण करण्यात आले होते. सर्वच क्षेत्रांत सातत्यपूर्ण गुणवत्तावाढीसाठी विद्यापीठ कटिबद्ध आहे. त्या प्रकारचे प्रयत्न आणि उपाययोजना आम्ही करीत आहोत. आगामी काळात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी आणि नियोजनबद्ध अंमलबजावणी करून विद्यापीठ सर्वच क्षेत्रांत अग्रेसर राहील, असा विश्वास आहे.– राजेश पांडे, सदस्य, राज्य सल्लागार समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ