पुणे : ‘वारसा अभियान’मुळे चित्रपटांचे जतन : अनुराग सिंह ठाकूर

पुणे : ‘वारसा अभियान’मुळे चित्रपटांचे जतन  : अनुराग सिंह ठाकूर
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान भारतीय चित्रपटांचा ठेवा जतन करण्याच्या प्रयत्नांना नवसंजीवनी देत आहे. पूर्वी सहज उपलब्ध नसलेले अनेक चित्रपट प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून दिले जातील, तसेच पुढील 100 वर्षे आणि त्याहून अधिक काळासाठी भारतीय चित्रपटांचे जतन केले जाईल, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी दिली. शनिवारी (दि.12) पुणे दौर्‍यादरम्यान राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला (एनएफएआय) ठाकूर यांनी भेट देत राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान अंतर्गत झालेल्या कामांचा आढावा घेतला.

ठाकूर यांनी एनएफडीसी -एनएफएआयच्या संकुलात नव्याने उभारलेल्या चित्रपट संवर्धन प्रयोगशाळेचीही पाहणी केली. या ठिकाणी सेल्युलॉइड रील्स संवर्धनाचे काम सुरू आहे. एनएफडीसी -एनएफएआयने अलीकडेच चित्रपट पूर्वस्थितीत आणण्याचे काम सुरू केले असून, 21 चित्रपट डिजिटलरित्या पुनर्संचयित केले जात आहेत. पुढील 3 वर्षांमध्ये अनेक चित्रपट, लघुपट आणि माहितीपट डिजिटल पद्धतीने पूर्वस्थितीत आणले जातील.

संग्रहालयात 3 प्रकल्पांचे काम
राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानांतर्गत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात 3 प्रकल्प सुरू आहेत. चित्रपटांचे डिजिटायझेशन, चित्रपटांचे जतन आणि चित्रपट पूर्वस्थितीत आणणे असे काम सुरू आहे. आतापर्यंत 1293 चित्रपट, 1062 लघुपट आणि माहितीपट, 4 घ व 2 घ रिझोल्यूशनमध्ये डिजिटाईझ करण्यात आले आहेत. 2500 चित्रपट तसेच लघुपट आणि माहितीपट डिजिटायझेशनच्या विविध टप्प्यांमध्ये आहेत. दरम्यान, 1433 सेल्युलॉइड रिल्सच्या संवर्धनाची कामे पूर्ण झाली आहेत, अशी माहितीही देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news