पुणे: पालखी सोहळा आपलं वैभव आहे. उत्साहाने वारकरी नागरिक पालखीत सहभागी होतात, हे भागवत धर्माचं दर्शन आहे. मला ज्ञानेश्वर माउलींच्या दर्शनाने आनंद होतोय, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पुण्यातील भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात पोहचल्यानंतर या ठिकाणी ज्ञानेश्वर माउलींचे दर्शन मी घेतले. मला अतिशय आनंद आहे की, मला दर्शन घेण्याची संधी मिळाली. (Latest Pune News)
आपल्याला माहीत आहे, हा पालखी सोहळा हे आपलं वैभव आहे आणि खर्या अर्थाने ज्या उत्साहाने वारकरी आणि नागरिक यामध्ये सहभागी होतात, एक प्रकारे संस्कृतीचं दर्शन, भागवत धर्माचं दर्शन या ठिकाणी पाहायला मिळतं, म्हणूनच मी दर्शन घेण्यासाठी पोहचलो. मी दर्शन घेऊन तृप्त झालो, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.