Saswad Moneylending: सासवडमध्ये खासगी सावकारीचा विळखा; वर्षानुवर्षे व्याज भरूनही ‘मुद्दल बाकीच!’

अवाच्या सव्वा व्याजदर, कोरे धनादेश आणि वाहनांची कागदपत्रे ताब्यात घेतल्याच्या तक्रारी; कथित दमदाटीने कर्जदार त्रस्त
Illegal Moneylending
Illegal MoneylendingPudhari
Published on
Updated on

सासवड: गरजेच्या वेळी आर्थिक मदतीचा हात म्हणून सावकाराकडून घेतलेले कर्ज अनेक कुटुंबांसाठी आता आयुष्यभराचा फास ठरत असल्याचे चित्र सासवड शहरासह ग्रामीण भागात दिसून येत आहे. एकदा घेतलेल्या कर्जाची वर्षानुवर्षे व्याजाची परतफेड करूनही ‘मुद्दल बाकी आहे,’ असे सांगत कर्जदारांच्या मानगुटीवर बसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

Illegal Moneylending
Junnar School Midday Meal: जुन्नरमध्ये शालेय पोषण आहाराचा ठेकेदारांचा गोंधळ; दोन महिने उलटले तरी धान्यसाठ्याचा तुटवडा

अवाच्या सव्वा व्याजदर, कोरे धनादेश व वाहनांची कागदपत्रे ताब्यात घेणे, व्याजावर व्याज आकारणे आणि वसुलीसाठी कथित दमदाटी यामुळे खासगी सावकारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सावकारीचे हे तळे वरून शांत दिसत असले, तरी त्याची खोली मोठी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Illegal Moneylending
Kedgaon Dapodi Gurhal Extortion: केडगाव-दापोडीत ‘तोतया पत्रकारा’कडून गुऱ्हाळचालकांना हप्त्याची मागणी?; कारवाईच्या धमकीने वसुलीचा आरोप

यापूर्वीही सासवड परिसरात कथित बेकायदा सावकारी व पठाणी वसुलीची काही प्रकरणे समोर आली असून, काही प्रकरणांत पोलिसांनी कारवाई केली आहे. मात्र, अशा प्रकारच्या व्यवहारांच्या मुळाशी असलेल्या व्यक्तींपर्यंत तपास पोहोचणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Illegal Moneylending
Pune Civic News: अप्पर बिबवेवाडीतील नागरी समस्यांचा डोंगर; रस्ता खचल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

कितीही पैसे भरा, मुद्दल बाकीच!

कर्जदाराने वर्षानुवर्षे व्याज आणि काही वेळा मुद्दलाचीही रक्कम परत केल्यानंतरही खाते पूर्ण होत नसल्याच्या तक्रारी आहेत. काही प्रकरणांमध्ये व्याजाची रक्कम वेळेत न भरल्यास त्यावरही पुढील व्याज आकारले जात असल्याचे सांगितले जाते.

Illegal Moneylending
Khadakwasla Dam Water Storage: खडकवासला धरणसाखळीने जुलैच्या पहिल्याच आठवड्यात गाठली शंभरी; दशकातील दुसरी सर्वांत लवकर तारीख

त्यामुळे सुरुवातीला घेतलेली रक्कम तुलनेने कमी असली, तरी कालांतराने कर्जाचा डोंगर वाढत जातो. कथित खासगी सावकारांकडून दरमहा १० ते २५ टक्क्यांपर्यंत व्याज आकारले जात असल्याच्या तक्रारी असून, प्रत्यक्ष व्यवहारात दर वेगवेगळा असल्याचे समोर येते. या व्यवहारांची अधिकृत चौकशी झाल्यास सावकारीच्या आर्थिक साखळीचे वास्तव स्पष्ट होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news