Saswad jowar market price: सासवड उपबाजारात ज्वारीला प्रतिक्विंटल 4 हजार दर

या वेळी गूळ व्यापारी शांतिकुमार कोठडिया उपस्थित होते.
Saswad jowar market price
Saswad jowar market pricePudhari
Published on
Updated on

सासवड: पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड (ता. पुरंदर) येथील उपबाजारात धान्याची मोठ्या प्रमाणात आवक होते. बुधवारी (दि. 6) ज्वारीला प्रतिक्विंटलला सर्वाधिक 4 हजार रुपयांचा दर मिळाल्याची माहिती निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी दिली.

सासवड उपबाजारात माळशिरस, राजुरी, वाघापूर, वाल्हा, गराडे, परिंचे, वीर, दिवे यांसह संपूर्ण पुरंदर, बारामती, इंदापूर, भोर, दौंड अशा विविध भागातून ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा असे धान्य विक्रीसाठी येते.

Saswad jowar market price
Indapur tamarind production: इंदापूरला चिंचेचे मुबलक उत्पादन अपेक्षित

बुधवारी सासवड उपबाजारात एक नंबर प्रतीच्या ज्वारीला कमाल 4 हजार रुपये, तर दोन नंबर प्रतीच्या ज्वारीला किमान 3 हजार रुपये, तर सरासरी 3 हजार 500 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला, असे निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मिलिंद जगताप यांनी सांगितले.

या वेळी सभापती संदीप फडतरे, उपसभापती बाळासो शिंदे, संचालक शरद जगताप, महादेव टिळेकर, वामनभाऊ कामठे, गणेश होले, अशोक निगडे, शरयू वाबळे, भाऊसाहेब गुलदगड, देविदास कामठे, सुशांत कांबळे, पंकज निलाखे, अनिल माने, संचालिका शहजान शेख, लिपीक विकास कांबळे यांसह व्यापारी आर. के. ट्रेडर्सचे रूपचंद कांडगे, आर. आर. ट्रेडर्सचे राजेंद्र जळिंद्रे, सत्यवान पवार, जितेंद्र महाजन, अविनाश महाजन, नंदकुमार महाजन, शैलेश विरकर आदी उपस्थित होते.

Saswad jowar market price
Mumbai Pune missing link: पुणे-मुंबई ‌‘मिसिंग लिंक‌’मुळे खंडाळा घाटातील कोंडी इतिहासजमा

यासह मंगळवारी (दि. 5) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निरा बाजारात गुळाची आवक 550 बॉक्स म्हणजेच 100 क्विंटल असल्याची माहिती गुळबाजाराची माहिती सहसचिव नितीन किकले, कृष्णात खलाटे, प्रवीण कर्णवर यांनी दिली. या वेळी गूळ व्यापारी शांतिकुमार कोठडिया उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news