Pune Youth Mental Health: ससूनमध्ये दररोज आत्महत्येचा प्रयत्न केलेले ४ ते ५ तरुण उपचारासाठी; मानसिक आरोग्याचा प्रश्न गंभीर

१५ ते ३० वयोगटातील तरुणांचे प्रमाण अधिक; प्रेमसंबंध, कौटुंबिक समस्या आणि परीक्षेचा ताण प्रमुख कारणे
Mental Health
Mental HealthPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: बदलत्या जीवनशैलीमुळे मनातील ताण व्यक्त करण्यासाठी संवादाचा अभाव, नातेसंबंधांतील गुंतागुंत, वाढत्या अपेक्षांचे ओझे आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे नैराश्यापासून आत्महत्येच्या प्रयत्नांपर्यंतच्या समस्यांचे चित्र ससून रुग्णालयातील आकडेवारीतून समोर आले आहे. यामध्ये १५ ते ३० वयोगटातील प्रमाण असून, तरुणींमध्ये हे प्रमाण तुलनेने अधिक असल्याचे निरीक्षण असून जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ही बाब चिंताजनक ठरत आहे.

Mental Health
MPSC Protest Hunger Strike: एमपीएससी आंदोलनातील तिघांचे उपोषण मागे; चौघांचे उपोषण सुरूच

मागील वर्षी विभागाच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) सुमारे ५२ हजार रुग्णांनी उपचार घेतले. चालू वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांतच सुमारे ३६ हजार रुग्णांची नोंद झाली आहे. दररोज १५० ते २०० रुग्ण उपचारांसाठी येत आहेत. तीव्र मानसिक आजार (स्किझोफ्रेनिया), मनोविकृती (बायपोलर डिसऑर्डर) आणि नैराश्य यासारख्या गंभीर आजारांसोबतच मुलांमधील चिडचिड, राग, अभ्यासात एकाग्रता न होणे आणि मोबाईल व समाज माध्यमांच्या अतिवापराशी संबंधित वर्तणुकीच्या समस्याही दिसून येत आहेत. दररोज आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या चार ते पाच रुग्णांना अन्य विभागांतून मानसोपचार विभागाकडे संदर्भित केले जात आहे. यातील बहुतांश रुग्ण १५ ते ३० वयोगटांतील असून, ही चिंतेची बाब आहे, अशी माहिती ससून रुग्णालयातील मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. निशिकांत थोरात यांनी दिली.

Mental Health
Rohit Pawar MPSC Protest: एमपीएससी परीक्षार्थींच्या पाठीशी वकिलांची फौज उभी करणार; रोहित पवारांची घोषणा

डॉ. थोरात म्हणाले की, आत्महत्येच्या प्रयत्नांमागे प्रेमसंबंधांतील तणाव, कौटुंबिक समस्या आणि परीक्षेचा ताण, ही प्रमुख कारणे आहेत. काही प्रकरणांत मद्यपान आणि व्यसनांचाही संबंध दिसतो. दर महिन्याला आत्महत्येच्या प्रयत्नांनंतर सुमारे १० ते १२ रुग्णांना दाखल करून उपचार करावे लागतात. रुग्णाच्या मनातील विचारांची तीव्रता, पूर्वीचे प्रयत्न, कौटुंबिक आधार आणि परिस्थितीचा सखोल आढावा घेऊन उपचार ठरवले जातात. गरजेनुसार औषधोपचार, समुपदेशन आणि विशेष उपचार दिले जात आहेत.

Mental Health
Pune Graduate Teacher Constituency Election: पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबरला मतदान; साडेचार लाख मतदार बजावणार हक्क

४० टक्के रुग्ण जिल्ह्याबाहेरील

ओपीडीमध्ये येणारे सर्वाधिक रुग्ण धाराशीव, बीड, अहिल्यानगर या बाहेरील जिल्ह्यांतून येणारे आहेत. त्यानंतर पुण्यातील दौंड तालुका, बारामती तालुक्यातील रुग्ण असून, शहरातील मानसिक रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. साधारणतः १५० किंवा २०० मध्ये रुग्णांपैकी ४० टक्के रुग्ण बाहेरून येणारे असून, विभागाला मोठी जोखीम पार पाडावी लागत आहे.

छात्र मानस कक्ष सुरू

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘छात्र मानस कक्ष’ सुरू केला आहे. त्याद्वारे बाह्य रुग्ण आणि नियमित उपचार घेणाऱ्या रुग्णांना समुपदेशनासाठी पाठवले जात आहे. दररोज चार ते पाच रुग्णांचे समुपदेश केले जात आहे. नवीन वातावरणाशी जुळवून घेणे, अभ्यासक्रमाचा ताण आणि घरापासून दूर राहण्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी त्यांच्या समस्यांमध्ये महत्त्वाच्या आहेत. तसेच, मुलांमध्ये वाढणाऱ्या वर्तणुकीच्या समस्या आणि भावनिक अस्थिरतेकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांकडून सांगण्यात आले.

Mental Health
Daund Sugarcane Price: दौंडमध्ये ऊसदराचा प्रश्न ऐरणीवर; शेतकऱ्यांची पहिला हप्ता ४,५०० रुपयांची मागणी

मानसिक त्रासाकडे दुर्लक्ष करणे किंवा तो लपवून ठेवणे, हा समस्येवरील उपाय नाही. कुटुंबीयांनी आणि शैक्षणिक संस्थांनी तरुणांचे म्हणणे ऐकून घेणे, वेळेवर समुपदेशन उपलब्ध करणे आणि मानसिक आरोग्याविषयीचा संकोच दूर करणे आवश्यक आहे. मानसिक आरोग्याची काळजी ही केवळ रुग्णालयाची जबाबदारी नसून कुटुंब आणि समाजाचीही आहे.

डॉ. निशिकांत थोरात, विभागप्रमुख, मानसोपचारशास्त्र विभाग, ससून

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news