पुणे : सरपंचांनी कृतिशील नेतृत्व करावे : राज्यमंत्री डॉ. भारती पवार

 एमआयटी-राष्ट्रीय सरपंच संसद महाराष्ट्र राज्य पदाधिकारी अधिवेशनाच्या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करताना डॉ. भारती पवार. या वेळी उपस्थित मान्यवर.
एमआयटी-राष्ट्रीय सरपंच संसद महाराष्ट्र राज्य पदाधिकारी अधिवेशनाच्या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करताना डॉ. भारती पवार. या वेळी उपस्थित मान्यवर.

पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'राष्ट्रविकासाच्या प्रक्रियेमध्ये गावाचा विकास सर्वांत महत्त्वाचा आहे. पंचायत ते पार्लमेंट या प्रवासात सरपंच हा लक्षणीय आणि महत्त्वाचा घटक आहे. सरपंच हे केवळ एक पद नाही, सरंपच हा सर्वसामान्यांचा विश्वास आणि सन्मान आहे. गावविकासात सरपंचांनी कृतिशील विचाराने कार्यरत राहिले पाहिजे,' असे मत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री
डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केले.

एमआयटीच्या वतीने आयोजित एमआयटी-राष्ट्रीय सरपंच संसद महाराष्ट्र राज्य पदाधिकारी अधिवेशन, नियुक्तिपत्र आणि ओळखपत्र वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड, राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील, अभिनव फार्मर्स क्लबचे संस्थापक ज्ञानेश्वर बोडके, सरपंच संसदेचे सहसमन्वयक प्रकाश महाले आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

या प्रसंगी डॉ. भारती पवार व राहुल कराड यांच्या हस्ते राज्यातील विविध जिल्ह्यांतील संयोजक, संघटकांचा नियुक्तिपत्र आणि ओळखपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला. डॉ. कराड म्हणाले, 'देशाच्या विकासाची प्रक्रिया अधिक गतिमान करायची असेल, तर एमआयटीसारख्या सामाजिक बांधिलकी जपणार्‍या शिक्षण संस्थांनी पुढाकार घेणे आणि अशा प्रयत्नांचे नेतृत्व करणे आवश्यक वाटले.

या भूमिकेतून राष्ट्रीय सरपंच संसद हा उपक्रम सुरू केला आहे. राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रसाद सानप यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. नीलम पंडित यांनी आभार मानले. विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी, पुणे विभाग

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news