Santosh Pandit: संतोष पंडित यांची येरवडा कारागृहात रवानगी

reel star santhosh pandit: पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाचा निर्णय; गुन्ह्याचा सखोल तपास सुरू
santosh pandit pune
Published on: 
Updated on: 

Pune Santosh Pandit Case Update

पुणे : उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि एका महिला नगरसेविकेबाबत समाजमाध्यमात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी रीलस्टार संतोष गजानन पंडित याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. पंडित याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला मंगळवारी शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डॉ. जी. आर. डोरनलपल्ले यांनी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.

santosh pandit pune
Santosh Pandit Arrest: रात्री 1 वाजता पोलिसांची धाड! संतोष पंडितांना घरातून उचललं; अटकेचा VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?

सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करताना ॲड. योगेश कदम म्हणाले की, आरोपीने केलेला गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा आणि महिलांविषयी आहे. तो रेकॉर्डवरील आरोपी असून त्याविरोधात यापुर्वी महिला विनयभंगाचे चार गुन्हे दाखल आहेत. पर्वती पोलिस ठाण्यात दोन आणि डेक्कन तसेच विश्रामबाग पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा नोंद आहे. तो सोशल मिडीयावरील ॲक्टिव्ह मेबर असून तो अशाच प्रकारे महिलांविषयी व संविधानिक पदावरील व्यक्तीचे विरुध्द आक्षेपार्ह अवमानकारक व्हिडीओ टाकून ते सोशल मिडीयावर प्रसारित करून समाजात अशांतता पसरविण्याची शक्यता नाकारता येत नाही.

santosh pandit pune
Satyam Pandit: जंतर-मंतरवरून परतणाऱ्या विद्यार्थ्यांना हिंदुत्ववादी नेत्याची मारहाण; वादग्रस्त सत्यम पंडित आहे तरी कोण?

याप्रकरणात अद्यापपर्यंत साक्षीदार यांकडे तपास सुरू आहे. आरोपी साक्षीदार यांचेवर दबाव टाकून सोशल मिडीयावर त्यांची बदनामी करण्याची शक्यता आहे. त्याचे आणखी कोणी साक्षीदार आहेत का याचा तपास करून आरोपीविरुध्द पुरावे उपलब्ध करून न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करायचे असल्याने त्याला न्यायालयीन कोठडीची मागणी ॲड. कदम यांनी केली. न्यायालयाने ती ग्राह्य धरत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. पंडित याच्या वतीने ॲड. वाजेद खान बीडकर, ॲड. सिसोदिया यांनी कामकाज पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news