आळंदी: कैवल्य साम-ाज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या जन्मवर्षानिमित्त माऊलींच्या अलंकापुरीत भव्य देदीप्यमान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यासाठी येणार्या भाविकांची मोठी संख्या लक्षात घेता आळंदी देवस्थान, आळंदी नगरपरिषद व ग्रामस्थ यांची नियोजनाची लगबग सुरू असून, दहा हजार भाविकांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था व कार्यक्रमातील नियोजन, मंडपव्यवस्था याची आळंदीत लगबग सुरू आहे.
सत्ताहाच्या तयारीसंदर्भात देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखी सोहळाप्रमुख डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज कबीर, मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. (Latest Pune News)
संत ज्ञानेश्वर माऊलींचा 750 वा जन्मोत्सव व सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त आळंदी देवस्थानच्या वतीने 3 मे ते 10 मे या कालावधीत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणिअखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
पारायणासाठी साडेतीन हजार भाविकांनी नोंदणी केली असून सप्ताहासाठी मंडप उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ग्रामस्थांनी नियोजनाच्या तयारीसाठी तेरा विविध समित्या बनवल्या असून अधिकाधिक भाविक यावेत यासाठी आवाहन करण्यात येत आहे.
पत्रकार परिषदेसाठी माजी सभापती डी. डी. भोसले पाटील, नंदकुमार कुर्हाडे, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर, रोहिदास तापकीर, माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुर्हाडे, भाजप नेते संजय घुंडरे, ज्ञानेश्वर शिक्षण संस्था सचिव अजित वडगावकर, माऊली गुळुंजकर, देवस्थान कमिटीचे प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, दिघी वाहतूक विभाग वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश नांदुरकर, पोलिस निरीक्षक पाटील, मच्छिंद्र शेंडे, शिवसेना शहर प्रमुख राहुल चव्हाण व इतर मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.