Ashadhi Wari: विठ्ठलाचा मला छंद, कपाळी लावतो गंध

Sanjay Shinde Mauli: वारकऱ्यांची सेवा करण्याची अनावर इच्छा त्यांना दरवर्षी घरदार सोडून वारीच्या वाटेवर ओढून आणते.
Ashadhi Wari
Ashadhi WariPudhari
Published on
Updated on

पुणे: मऊ मेणाहूनी आम्ही विष्णूदास। कठीण वज्रास भेदूं ऐसे॥ जगद्‌गुरू संत तुकाराम महाराजांच्या या उक्तीप्रमाणे वारीच्या वाटेवर सुखाचा, समाधानाचा आणि भक्तीचा गंध वाटणारे एक साधेभोळे व्यक्तिमत्त्व म्हणजे संजय शिंदे माउली.

​वय ६० वर्षे, डोक्यावर पांढरी टोपी, गळ्यात तुळशीची माळ आणि हातात गंधाची वाटी घेऊन पंढरीच्या वाटेवर चालणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला थांबवून त्याच्या कपाळावर गंध-टिळा लावणारे संजय शिंदे हे उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातील तुळजापूरजवळील बामणीवाडी गावचे राहणारे आहेत.

Ashadhi Wari
Banner Controversy: पालकमंत्र्यांचा फोटो स्वागत फलकांवर नसल्याने नाराजी; महापौर राजकारण करीत असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप

घरात शेतीवाडी आहे, दोन मुले सुखात आहेत, वयाची साठी गाठली; तरी पंढरीच्या विठुरायाची ओढ आणि वारकऱ्यांची सेवा करण्याची अनावर इच्छा त्यांना दरवर्षी घरदार सोडून वारीच्या वाटेवर ओढून आणते.

Ashadhi Wari
Ekta Nagar News: एकतानगरी पुनर्वसन प्रस्ताव कागदावरच; दोन वर्षे उलटली तरी कार्यवाही नाही

संजय शिंदे हे दरवर्षी पंढरपूरची वारी करतात. मात्र, वारीत फक्त स्वतः चालण्यापेक्षा विठ्ठलरूपातील वारकऱ्यांची काहीतरी सेवा घडावी, या भावनेतून त्यांनी एक अनोखा मार्ग निवडला. गेल्या ५ वर्षांपासून ते वारीच्या संपूर्ण मार्गावर वारकऱ्यांना मोफत गंध-टिळा लावण्याची सेवा करीत असून, वारकऱ्यांची सेवा करण्याचा वसा घेतल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news