

येरवडा; पुढारी वृत्तसेवा : येरवड्याहून-संगमवाडीकडे जाणारा रस्ता सिमेंट काँक्रिटीकरणाचा करण्यात आला आहे. पदपथ, सायकल ट्रॅक नव्याने करण्यात आला आहे. मात्र, पदपथावरील सर्वच लाईट गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. रस्त्यावर पूर्णतः अंधार असल्याने अपघात, चोरी, लूटमारी, महिलांची छेड काढणे, असे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे विद्युत लाईट तातडीने सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.
पुणे शहरात ये-जा करण्यासाठी संगमवाडी हा मार्ग जवळचा मानला जातो. याशिवाय या रस्त्यावर ट्रॅव्हल पार्किंग असल्याने हा रस्ता पूर्णतः प्रवाशांनी गजबजलेला असतो. मात्र, रात्रीच्या वेळी रस्त्यावर लाईट लागत नसल्यामुळे खूप चुकीच्या गोष्टी घडत आहेत. प्रवासी महिलांची छेडछाड काढली जात आहे. वाहने एकमेकांना दिसत नसल्याने अपघात होत आहेत.
पोलिस उपायुक्त रोहिदास पवार म्हणाले, मया रस्त्यावर अंधाराचा फायदा घेत गुन्हेगारी, अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यासाठी महापालिकेने रस्त्यावरील लाईट सुरू करणे गरजेचे आहेफ विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल म्हणाले, मया रस्त्यावर दुभाजक बनविण्याचे काम सुरू आहे. महापालिकेमार्फत लगेच लाईटची व्यवस्था केली जाईल.