Ashok Kharat case | रूपाली चाकणकरच मुख्य सूत्रधार; भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी रूपाली ठोंबरेंचा गंभीर आरोप

राजकीय कुरघोडीत विषय भरकटला तर माताभगिनींवर झालेल्या अन्यायाची सत्यता समोर येणार नाही
 Ashok Kharat case
जित पवार राष्ट्रवादी गटाच्या नेत्या रूपाली ठोंबरे. File Photo.
Published on
Updated on

Ashok Kharat case

पुणे : भोंदू बाबा अशोक खरात याने 400, 500, 800 कोटी रुपयांची मालमत्ता कोठून आणली? त्याच्या ट्रस्टला अनेक बक्षीसपत्र दिलेली असून, ती धाकधपाट्याने दिलेली आहेत का स्वइच्छेने दिलेली आहेत?, असा सवाल करत त्‍याच्‍या सेक्स रॅकेटचा कारभार संविधान पदावर असलेल्या महिलेच्या आशीर्वादाने चालत होता, असा गंभीर आरोप अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी आज ( दि. 22 मार्च) पत्रकार परिषदेत केला. ट्रस्टमधल्या प्रत्येकाला आरोपी करणं आणि त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. कारण एकटा खरात आरोपी नाही, असा दावाही त्‍यांनी केला.

माझी खासदार-आमदारांना हात जोडून विनंती आहे की...

एकनाथ शिंदे आमदारांना घेवून गुवाहाटीला गेले. संजय राऊत यांनी विषय काढला आहे तर तपासून घ्या. मला असं वाटतं की, जे आमदार गुवाहाटीला गेलेले होते, त्यांचा मार्ग अशोक खराने दाखवला असेल. दीपक केसरकर असतील, त्यांच्यावरती सुद्धा कारवाई व्हावी. कदाचित अशोक खरात त्‍याने त्‍याचे तोंड उघडेल तर मंत्रिमंडळात जवळपास पाच मंत्री आहेत. त्‍यांची नावे समोर येतील. माझी खासदार-आमदारांना हात जोडून विनंती आहे की, राजकारणाच्या तुमच्या कुरघोडीमध्ये तुमचे हेवेदावे भोंदू बाबा अशोक खराच्या याच्यात काढू नका.हा विषय जर थोडा जरी भरकटला, तर महाराष्ट्रातील माताभगिनींवर झालेल्या अन्यायाची सत्यता समोर येणार नाही, असे आवाहनही रुपाली ठोंबरे यांनी केले.

 Ashok Kharat case
Rupali Chakankar Resignation: पक्षात नसते तर या बाईला पुण्यात फिरू दिलं नसतं... संतापलेल्या ठोंबरेंनी चाकणकरांचं सगळंच काढलं

जात-धर्माचा आधार घेवून गुन्‍हेगारांना वाचवण्‍याचा प्रयत्‍न

"भोंदू बाबा अशोक खरातच्या सेक्स रॅकेटमधील मुख्य आरोपींची बाजू घेणार्‍यांना माझे खुले आव्हान आहे, की त्‍यांना गुन्हेगारांचे समर्थन करायचे असेल, तर आधी आपल्या घरातील महिलांना त्यांच्यासोबत कामाला पाठवण्याची हिंमत दाखवा; मगच समाजाला उपदेश द्यायला या. अनेक वर्षांपासून अशा प्रकरणांमध्ये जात किंवा धर्माचा आधार घेऊन गुन्हेगारांना वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पण यावेळी या रॅकेटच्या सूत्रधार महिलाच आहेत. त्या महिला आहेत म्हणून कायद्याच्या नजरेत त्यांचा गुन्हा माफ होत नाही, असेही रुपाली ठोंबरे म्‍हणाल्‍या.

 Ashok Kharat case
Sanjay Raut | राज्य मंत्रिमंडळातील ९ मंत्री भोंदूबाबा अशोक खरातचे नियमित भक्त: संजय राऊत यांचा दावा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news