RTO Action: ’आरटीओ’कडे रिक्षाचालकांविरोधात 252 तक्रारी

भाडे नाकारणे, उद्धट वर्तन, अतिरिक्त भाडे, रिक्षा मीटर फास्टच्या कारणावरून तीन महिन्यांत 175 जणांना नोटीस
RTO Action: ’आरटीओ’कडे रिक्षाचालकांविरोधात 252 तक्रारी
Published on
Updated on

पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) गेल्या तीन महिन्यांत तब्बल 252 रिक्षाचालकांविरोधात आलेल्या तक्रारींमुळे कडक कारवाई करायला सुरुवात केली आहे. भाडे नाकारणार्‍या आणि प्रवाशांशी उद्धट वर्तन करणार्‍यांना त्यामुळे चांगलीच चपराक बसली आहे. (Pune Latest News)

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने बजाविलेल्या नोटिसांमुळे आणि केलेल्या दंडामुळे रिक्षाचालक-मालकांच्या वर्तुळात घबराट पसरली असून, याबाबत आरटीओने सौम्य भूमिका घ्यावी, अशी मागणी रिक्षा संघटनांनी केली आहे. त्याचप्रमाणे सर्व रिक्षा व्यावसायिकांनी प्रवाशांना नियमानुसार उत्तम सेवा पुरवावी, असे आवाहनही केले आहे.

एप्रिल ते जून 2025 या कालावधीत आरटीओला 252 तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी 175 रिक्षाचालकांना नोटिसा पाठविल्या आहेत. इतर तक्रारींवर लवकरच कारवाई केली जाणार आहे, असे आरटीओकडून सांगण्यात आले आहे.

RTO Action: ’आरटीओ’कडे रिक्षाचालकांविरोधात 252 तक्रारी
CET 2025 Admission: तंत्रशिक्षण प्रवेशासाठी मिळणार 300 पर्याय; ‘सीईटी सेल’कडून विद्यार्थ्यांना चारही फेर्‍यांच्या प्रवेशासंदर्भात मार्गदर्शन

गणवेश बंधनकारक...

पुण्यातील रिक्षाचालकांना पांढरा शर्ट आणि खाकी पँट, असा गणवेश परिधान करणे बंधनकारक आहे. कोणत्याही अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि ओळख पटविण्यासाठी महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 नुसार हा नियम लागू आहे. अनेक रिक्षाचालक या नियमाचे पालन करीत नसल्याचेही आरटीओच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे रिक्षाचालकांनी गणवेश परिधान करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अक्र. - प्रकार - तक्रारींची संख्या

1) भाडे नाकारणे - 102

2) उद्धट वर्तन - 55

3) अतिरिक्त भाडे आकारणी - 65

4) फास्ट मीटर - 30

- एकूण तक्रारी - 252

RTO Action: ’आरटीओ’कडे रिक्षाचालकांविरोधात 252 तक्रारी
Pune News| वाद घटस्फोटाचा पण चिंता मुलाच्या भविष्याची; आईने मागितली पोटगी, पित्याने दिले तीस लाख

तक्रारीसाठी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक

पुणे आरटीओने मनमानी करणार्‍या रिक्षाचालकांची तक्रार करण्यासाठी 8275330101 हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक सुरू केला आहे. या क्रमांकावर प्रवाशांनी आपले नाव, मोबाईल नंबर, प्रवास मार्ग, रिक्षा नंबर, रिक्षाचा फोटो आणि मीटर भाड्याचा फोटो पाठवून तक्रार दाखल करावी. आरटीओकडून अशा तक्रारींवर तत्काळ आणि कठोर कारवाई करण्यात येईल, असे आरटीओकडून सांगण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news