Maharashtra RTE Fee Reimbursement: आरटीई 25% प्रवेश शुल्क प्रतिपूर्तीसाठी 62.85 कोटींचा शासन निर्णय

थकीत शुल्क प्रतिपूर्तीसाठी निधी मंजूर; शाळांना दिलासा मिळणार
RTE admission
RTE Admission Pudhari
Published on
Updated on

पुणे: महाराष्ट्र शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीसाठी ६२.८५ कोटी रुपये वितरीत करण्याचा महत्त्वाचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.

RTE admission
Maharashtra Agriculture University Posts Approval: राज्यातील कृषी विद्यापीठांना 3723 पदांची मंजुरी; कृषी शिक्षणाला नवी गती

शासन निर्णय ९ जून २०२६ नुसार हा निधी प्राथमिक शिक्षण संचालक, पुणे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. हा निधी २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी वित्त विभागाच्या अखत्यारीतून उपलब्ध करून दिला असून, मुख्यतः उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार थकीत शुल्क प्रतिपूर्ती आणि न्यायालयीन प्रकरणांशी संबंधित शाळांना देय रक्कम भरण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

RTE admission
Daund Sex Determination Racket: दौंड गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश; तिघांना अटक, काही डॉक्टर फरार

शिक्षण संचालक, प्राथमिक यांनी वेळोवेळी शासनाकडे निधीची मागणी केली होती. या निधीचा वापर करताना २१ ऑगस्ट २०१९ च्या शासन परिपत्रकानुसार पडताळणी करावी लागणार आहे. अनुदानित शाळांना हा लाभ लागू होणार नाही.

RTE admission
Pune Drain Cleaning Scam: पुण्यात पावसाळी वाहिन्यांच्या साफसफाईतील गैरप्रकार उघड; 50 टक्के कामांवर प्रश्नचिन्ह

सर्व खर्च ३१ मार्च २०२७ पूर्वी पूर्ण करणे अनिवार्य असून, उपयोगिता प्रमाणपत्र तातडीने सादर करावे लागेल. जिल्हास्तरावरील प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन केंद्र शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करावी, असे निर्देश दिले आहेत.

RTE admission
Pune Municipal Schools Proposal: पुणे महापालिकेच्या 5 शाळा खासगी संस्थेकडे; 100 कोटींच्या प्रस्तावावरून वाद

निर्णयामुळे आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या शाळांना दिलासा मिळणार आहे. सध्या राज्यात आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू असून, मोफत शिक्षणाच्या हक्काची अंमलबजावणी अधिक प्रभावी होण्यास मदत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news