तळेगावातील वीज कार्यालयांकडे जाणा-या रस्त्याचे काम पुर्ण

तळेगावातील वीज कार्यालयांकडे जाणा-या रस्त्याचे काम पुर्ण

तळेगाव स्टेशन(पुणे); पुढारी वृत्तसेवा : तळेगाव दाभाडे येथील तळेगाव-चाकण रोड येथून वीज कार्यालये, वीज कर्मचारी वसाहत आणि आजुबाजुंच्या नागरीक वसाहतीकडे जाणारा रस्ता अनेक वर्षांपासुन खराब झालेला होता. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते, पाणी साचत होते, रस्ता उखडला होता. यामुळे वीज ग्राहकांची, वीज कर्मचारी वसाहतीमधील रहिवाशांची, वाहन चालविणा-यांची गैरसोय होत होती. तसेच अपघात होवून जिवीत हानीही होत होती.

यामुळे नागरिकांकडून या रस्त्याच्या दुरुस्तीची आणि डांबरीकरणाची सतत मागणी होत असल्यामुळे दै. पुढारी मधून अनेक वेळा या रस्त्याच्या दुरुस्तीकरणाच्या बातम्या देण्यात आल्या होत्या. याबाबत वीज कर्मचा-यांनी आणि नागरिकांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषद,  सार्वजनिक बांधकाम खाते वडगाव मावळ यांना निवेदने देऊन सतत पाठपुरावा केला होता.

तसेच या रस्त्याचे काम मार्गी लागण्यासाठी मावळचे आ. सुनील शेळके यांनी आमदार निधीतून चाळीस लाख रुपयांची मदत केली. सदर रस्त्याचे दुरुस्तीचे आणि डांबरीकरणाचे काम मार्गी लागून नुकतेच डांबरीकरणाचे काम पुर्ण झाले आहे. यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेले काम पुर्ण झाले असुन वीज ग्राहकांची, सभोवतालच्या रहिवाशांची सोय झाली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news