पुणे : नदीजोड प्रकल्प महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा : खा. नाईक निंबाळकर

पुणे : नदीजोड प्रकल्प महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा : खा. नाईक निंबाळकर

भवानीनगर : पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् करण्याच्या दृष्टीने नदीजोड प्रकल्प महत्त्वाचा असून, दुष्काळी भागासाठी हा प्रकल्प वरदान ठरणार आहे, असे मत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले. सणसर (ता. इंदापूर) येथे निरा-भीमा नदीजोड प्रकल्पाची खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शनिवारी (दि. 25) पाहणी केली. नाईक निंबाळकर यांनी सणसर येथील बोगद्याच्या एक्झिटमधून 120 फूट खोल बोगद्यामध्ये उतरून बोगद्याची माहिती घेतली.

या प्रकल्पाच्या अडचणी दूर करणे, शेतकर्‍यांच्या शेतीच्या पाण्याची अडचण दूर करून माढा व करमाळा तालुक्यांतील शेतकर्‍यांना या प्रकल्पातून पाणी उपलब्ध करून देणे, मराठवाड्याचे एक थेंबही पाणी कमी न करता बोगद्याला अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देणे, हा या भेटीचा उद्देश आहे. आमच्या भागाचे पाणी म्हणजे माढा मतदारसंघाचे पाणी माढा मतदारसंघाला मिळाले पाहिजे. बारामती व इंदापूरलाही पाणी मिळाले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. दहा लाख लोकांची इच्छा होती की, निरा देवघरचे पाणी निरा देवघरच्या लाभक्षेत्रात मिळाले पाहिजे. यासाठी मतदारांनी मला खासदार करण्यासाठी आशीर्वाद दिला. मतदारांनी ज्यासाठी निवडून दिले, त्यांची अपेक्षा पूर्ण करण्याचे काम आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताकदीने पूर्ण केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news