मावळ: ओढ्याचे पाणी शिरल्याने भातरोपे कुजली

मावळ: ओढ्याचे पाणी शिरल्याने भातरोपे कुजली

कार्ला : मावळ तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसने मावळ तालुक्यातील भात शेतीचे मोठे नुकसान झाले असून कार्ला येथील जुन्या मुंबई-पुणे महामार्गा जवळून जाणार्‍या ओढ्याचे पाणी शेतात साचल्याने भातरोपे कुजल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कार्ला फाट्यावरुन येणारा ओढा तसेच शिलाटणे ,दहिवली येथील डोंगरद-यातील पावसाचे पाणी घेऊन येणारा ओढ्यांचे नैसर्गिक मार्ग बदलामुळे तसेच सुरक्षभिंत बांधल्यामुळे तसेच ओढ्याच्या मार्गावर लोखंडी सळ्यालावल्याने प्लास्टिक तसेच राडारोड्यामुळे पाण्याचा मार्ग थांबला जात असून हे पाणी मागे फिरत असल्याने परिसरातील शेतकर्‍यांच्या भात शेतात शिरत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

यावर्षीच नाहीतर दरवर्षी ह्या संकटाचा सामना शेतकर्‍यांना करावा लागतो. त्यामुळे या ओढ्याचे खोलीकरण करण्यात यावे; तसेच ह्या ओढ्यावर असणारे अतिक्रमणे काढण्यात यावी, अशी मागणी कार्ला येथील शेतकरी करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news