

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 31 जुलै 2022 रोजी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षांचा अंतिम निकाल मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला. पाचवीच्या परीक्षेत 23.90 टक्के, तर आठवीच्या परीक्षेत 12.53 टक्के विद्यार्थी पात्र ठरले आहेत. 3 लाख 82 हजार 797 विद्यार्थ्यांनी पाचवीची परीक्षा दिली.
त्यातून 91 हजार 470 विद्यार्थी पात्र झाले. 2 लाख 79 हजार 466 विद्यार्थ्यांनी आठवीची परीक्षा दिली. त्यापैकी 35 हजार 34 विद्यार्थी पात्र झाले आहेत. शाळांना विद्यार्थ्यांचा निकाल आपल्या लॉगइनमधून; तसेचwww. mscepune. in d https:// www. mscepuppss. in या वेबसाइटवर निकाल पाहता येईल.