

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिका मुख्य इमारतीतील महिलांसाठी सुरू केलेला हिरकणी कक्ष गेल्या काही महिन्यांपासून गायब झाला आहे. तो पुन्हा सुरू करावा, अशी मागणी सजग नागरिक मंचने केली आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीतील महिला कर्मचारी तसेच कामानिमित्त येणार्या महिलांसाठी 2016 साली गाजावाजा करून हिरकणी कक्ष उभारला होता.
या ठिकाणी स्तनदा मातांना बालकांना दूध पाजण्याची व्यवस्था तसेच आजारी महिलेला विश्रांती घेण्याची सोय होती. मुख्य इमारतीच्या तळमजल्यावर हा कक्ष होता. मात्र हा कक्ष काही महिन्यांपासून गायब झाला आहे. प्रशासन महिला कर्मचारी व महिला नागरिक यांच्याविषयी किती संवेदनाशून्य आहेत हे स्पष्ट होते, अशी टीका विवेक वेलणकर यांनी केली आहे.