

मंचर : पुढारी वृत्तसेवा : जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांत पोलिस पाटलांच्या रिक्त असलेल्या 96 जागा भरण्यात येणार आहेत. याबाबतची आरक्षण सोडत शुक्रवारी (दि. 30) उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. या वेळी आंबेगावचे तहसीलदार संजय नागटिळक, जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस, खेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, जुन्नरचे उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर, नायब तहसीलदार सचिन मुंढे उपस्थित होते.
जुन्नर तालुक्यातील गावे व आरक्षण पुढीलप्रमाणे – खिलारवाडी – भटक्या जमाती (क), धालेवाडी तर्फे हवेली अनुसूचित जाती, राळेगण -अनुसूचित जाती महिला, अमरापूर – अनुसूचित जाती, हापूसबाग – भटक्या जमाती (क) महिला, तेजेवाडी – विमुक्त जाती अ. महिला, चिंचोली – भटक्या जमाती (ड), बादशहा तलाव – आर्थिक दुर्बल घटक महिला, बागायत खुर्द – भटक्या जमाती (ड), हतबन – खुला, आगर – विमुक्त जाती (अ), मांदारणे – अनुसूचित जाती, विघ्नहरनगर – इतर मागास वर्ग, ठिकेकरवाडी – खुला महिला, पिंपरी पेंढार – इतर मागास वर्ग, हिवरे खुर्द – इतर मागासवर्ग महिला, धोलवड – भटक्या जमाती (ब), खामुंडी – आर्थिक दुर्बल घटक महिला, गायमुखवाडी – इतर मागास वर्ग, रोहकडी – खुला, बल्लाळवाडी – इतर मागास वर्ग, नेतवड – अनुसूचित जाती महिला, ओझर- खुला महिला, पिंपळगाव तर्फे नारायणगाव – अनुसूचित जाती महिला, शिरोली तर्फे आळे -अनुसूचित जाती महिला, धनगरवाडी- अनुसूचित जाती, पिंपरी कावळ – विमुक्त जाती अ, बोरी खुर्द – आर्थिक दुर्बल घटक, आर्वी – अनुसूचित जाती, औरंगपूर – अनुसूचित जाती महिला, वागलोहोरे – भटक्या जमाती ड महिला, सुलतानपूर – आर्थिक दुर्बल घटक, गुंजाळवाडी (आर्वी) – भटक्या जमाती (ड), गुंजाळवाडी (बेल्हा) – आर्थिक दुर्बल घटक, कोंबरवाडी – भटक्या जमाती (ब), राजुरी – भटक्या जमाती (ब), यादववाडी – भटक्या जमाती (ब) महिला, तांबेवाडी – इतर मागास वर्ग, आनंदवाडी – भटक्या जमाती (क) महिला, बांगरवाडी – इतर मागास वर्ग महिला, आळे – विमुक्त जाती (अ) महिला, गोंद्रे, इंगळून, सोमतवाडी, हिवरे तर्फे मिन्हेर, मढ, हातवीज, खामगाव, पांगरी तर्फे मढ, खुबी, दातखिळवाडी ही गावे अनुसूचित जमातीसाठी आहेत. अनुसूचित जमाती महिलेसाठी वाटखळे, तळेरान, करांजळे, पिंपळगाव जोगा,आळू, बुचकेवाडी, पाडळी, भोईरवाडी, पांगरी तर्फे ओतूर ही गावे राखीव आहेत.
आंबेगाव तालुका – वडगावपीर – इतर मागासवर्ग महिला, पोंदेवाडी – अनुसूचित जाती महिला, धामणी – अनुसूचित जाती, पहाडदरा – अनुसूचित जमाती, गवारवाडी – इतर मागासवर्ग महिला, गिरवली – इतर मागासवर्ग, तळेकरवाडी – आर्थिक दुर्बल घटक, कळंब – भटक्या जमाती (क), चिंचोडी – खुला महिला, मोरडेवाडी – खुला महिला, गावडेवाडी – इतर मागासवर्ग महिला, श्रीरामनगर – खुला महिला, वडगाव काशिंबेग – विशेष मागास प्रवर्ग, लौकी – विशेष मागास प्रवर्ग, पारगाव तर्फे खेड – इतर मागासवर्ग महिला, निघोटवाडी – भटक्या जमाती (ब) महिला, कुरवंडी – खुला महिला. न्हावेड, पोखरकरवाडी, कळंबई, साकोरी, दिगद, अडिवरे, मेघोली, वचपे, आसाणे, कुशिरे बुद्रुक , पिंपरगणे ही गावे अनुसूचित जमातीसाठी आहेत. तर गंगापूर खुर्द, सुपेधर, जांभोरी, आंबेगाव, आमोंडी, महाळुंगे तर्फे घोडा, मापोली, महाळुंगे तर्फे आंबेगाव ही गावे अनुसूचित जमाती महिलेसाठी आहेत.