पुणे : मेट्रोमुळे पाणी साठणार्‍या ठिकाणी उपाय

पुणे : मेट्रोमुळे पाणी साठणार्‍या ठिकाणी उपाय

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मेट्रो प्रकल्पाच्या सदोष कामामुळे शहरातील काही भागांमध्ये रस्त्यावर पाणी साठून राहाते. यासंदर्भात मेट्रोसोबत समन्वय साधून पाण्याचा निचरा होण्यासाठी तातडीने कामे हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. शहरात मागील काही वर्षांपासून मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. जंगली महाराज रस्त्यावर मागील दोन-तीन वर्षांत मेट्रोच्या कामामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साठत आहे. मेट्रोच्या कामामुळे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांना अडथळा आल्याचे निदर्शनास आले आहे.

याच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले असून, लवकरच नवीन दोन वाहिन्यादेखील विकसित करण्यात येणार आहे. तसेच कर्वे रस्त्यावर वनाज आणि एसएनडीटी परिसरातही मेट्रो पुलाखाली डिव्हायडर टाकल्याने रस्त्यावरून नैसर्गिकरीत्या पाणी वाहून जाण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. त्यावर मेट्रो प्रशासनाने कुठलीच उपाययोजना केलेली नाही, त्यामुळे यंदाच्या अवकाळीत सलग दोन वेळा येथील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news