तूर, उडीदडाळ महागली ! मूगडाळ, खाद्यतेलांच्या दरात घट

तूर, उडीदडाळ महागली ! मूगडाळ, खाद्यतेलांच्या दरात घट
Published on
Updated on

पुणे : आवक मुबलक असून मागणी कमी असल्यामुळे खाद्यतेलाच्या दरात गेल्या आठवड्यात 15 किलो/लिटरच्या डब्यामागे वीस ते पंचवीस रुपयांनी वाढ झाली. मात्र वनस्पती तुपाच्या दरात 30 रुपयांनी वाढ झाली. तूरडाळीची दरवाढ सुरूच असून गेल्या आठवड्यातही दरात आणखी तीनशे रुपयांनी वाढ झाली. मागणी वाढल्याने उडीदडाळीच्या दरातही क्विंटलमागे 300 ते 400 रुपयांनी वाढ झाली. अन्य जिनसांचे दर स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

यावर्षी तुरीचे उत्पादन कमी प्रमाणात झाल्यामुळे हंगाम काळापासूनच तूरडाळीचे दर चढे असून दिवसागणिक त्यात वाढ होत आहे. सध्या बाजारात आवक कमी होत असून उत्पादन केंद्रातही दरवाढ सुरूच आहे. गेल्या आठवड्यातही येथील घाऊक बाजारात दर क्विंटलमागे आणखी 300 रुपयांनी वाढले. आवक कमी असून मागणी वाढल्यामुळे उडीदडाळीच्या दरातही 300 ते 400 रुपयांनी वाढ झाली. मात्र मागणी कमी असल्यामुळे मूगडाळीचे दर 200 रुपयांनी उतरल्याचे सांगण्यात आले. अन्य डाळी तसेच कडधान्यांचे दर स्थिर होते.

खाद्यतेले उतरली, वनस्पती तूप महागले
गेल्या आठवड्यात शेंगदाणा तेलासह सर्वच खाद्यतेलांच्या दरात 15 किलो / लिटरर्च्या डब्यामागे 20 ते 25 रुपयांनी वाढ झाली होती. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, पाम तसेच सूर्यफूल तेलास मागणी कमी झाल्याने दरात पुन्हा एकदा घसरण झाली. दरम्यान अमेरिकेन अर्थव्यवस्था अडचणीत असल्याच्या बातम्यांमुळे त्यात आणखी भर पडली आहे. दरम्यान स्थानिक बाजारातही ग्राहकांचा फारसा प्रतिसाद नसल्यामुळे बाजारातील उलाढाल मंदावली आहे. यामुळे गेल्या आठवड्यात शेंगदाणा तेलांसही सर्वच खाद्यतेलांचे दर डब्यामागे 20 ते 25 रुपयांनी उतरले. मात्र वनस्पती तूप तयार करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या स्टेरिनचा तुटवडाा असल्यामुळे वनस्पती तुपाचे दर गेल्या आठवड्यात 15 किलोमागे आणखी तीस रुपयांनी वाढले.

पुण्याच्या घाऊक बाजारातील दर पुढीलप्रमाणे – साखर (प्रतिक्विंटल) 3650 ते 3675 रु. खाद्यतेले (15 किलो/लिटर):- शेंगदाणा तेल 2750–2800, रिफाईंड तेलः 2550-3300, सरकी तेल 1500-1800, सोयाबीन तेल 1500-1700, पामतेल 1425-1600, सूर्यफूल रिफाईंड तेल 1550-1700, वनस्पती तूप 1550-1950, खोबरेल तेल 2250 रु.
तांदूळ : गुजरात उकडा 3200-3500, मसुरी 3000-3300, सोनामसुरी 4000-4400, एच.एम.टी. कोलम 4500-5000, लचकारी कोलम 5500-6000, चिन्नोर 4500-5000, 1121-10000-11000, आंबेमोहोर (सुवासिक) 7000-8000, बासमती अखंड 11500-12000, बासमती दुबार 8500-9000, बासमती तिबार 9500-10000, बासमती मोगरा 4500-5000, बासमती कणी 3200-3500, 1509-8000-8500, इंद्रायणी 4500-5000 रु.

गहू – सौराष्ट्र लोकवन नं. 1 3700-4000, सौराष्ट्र लोकवन नं. 2 3400-3600, एम.पी. लोकवन नं.1 3600-3800, नं.2 3400-3600, सिहोर 4800-5500, सिहोरी 3400-3800, मिलबर 2350-2450 रु. ज्वारी :- गावरान नं. 1- 5000-5500, गावरान नं. 2-4600-4900, नं. 3 4200-4500, दूरी 3500-3900 रु.

बाजरी :- महिको 3200-3800, गावरान 3200-3500, हायब्रीड 3000-3200 रु. गूळ :- गूळ एकस्ट्रा 4100-4250, गूळ नं. 1 3900-4050, गूळ नं. 2 3900-3785, गूळ नं.3 3700-3725, बॉक्स पॅकिंग 4000-5000 रु.

डाळी : तूरडाळ 11500-13200, हरभराडाळ 5900-6100, मूगडाळ 9500-9600, मसूरडाळ 7400-7500, मटकीडाळ 10000-11000, उडीदडाळ 10000-11000 रु. कडधान्ये :- हरभरा 5400-5500, हुलगा – 7100-7200 चवळी 7000-9000, मसूर 6600-6800, मूग 9000-9500, मटकी गावरान 9000-9200, मटकी पॉलिश 7500-8000, मटकी गुजरात 8000-8200, मटकी राजस्थान 8000-8200, मटकी सेलम 11500-11700, वाटाणा हिरवा 5500-6000, वाटाणा पांढरा 5500-6000, काबुली चणा 9000-15000 रु.

साबुदाणा :- साबुदाणा नं.1 7000, साबुदाणा नं.2 6800, साबुदाणा नं. 3 6500 रु. वरई भगर :- 11000-12000, सावा भगर 10000-11000, गोटा खोबरे 1100-1300 रु. शेंगदाणा :- जाडा 11700-12200, स्पॅनिश – 11700-11800, घुंगरु 10700 रु. धने :- गावरान 8000-8500, इंदूर 9000-12000 रु.

मका लाल 2475-2550, पिवळा लाल 2475-2550, पांढरा 3200-3300 रु. पोहे : मध्य प्रदेश 4000-4400, पेण 4000-4300, मध्यम पोहा-3800-4300, दगडी पोहा 3800-4400, पातळ पोहा 4400-5200, सुपर पोहा 4400-4700, भाजका पोहा 600-650, मका पोहा 625-675, भाजके डाळे 2800-3200, मुरमुरा 475-525, भडंग 750-850, घोटी 450-475, सुरती 475-500 रु. रवा, मैदा, आटा – (50 किलोचा भाव) आटा 1450-1500, रवा 1475-1525,

मैदा 1475-1525, बेसन :- (50 किलोस) 3300-3600 रु. मीठ :- मीठ खडे (50 किलोस) 230, मीठ दळलेले (50 किलोस) 250 रु.
मिरची :- काश्मीरी ढब्बी 7000-75000, ब्याडगी 57500-60000, लवंगी तेजा 24000-25000, गुंटूर 25000-27000, खुडवा गंटूर 14000-15000, खुडवा ब्याडगी 17000- 20000 रु. नारळ :- (शेकड्याचा भाव): नवा पॅकिंग 1100-1200, मद्रास 2300-2500, पालकोल जुना 1400-1450, सापसोल 2000-2700 रु.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news