Baramati News: बारामती विमान अपघातात रेड बर्ड एविशनचा विमानाचा टायर निखळला

बारामतीमध्ये शनिवारी (दि. ९) सकाळी १० च्या सुमारास हा अपघात झाला असल्याची चर्चा आहे.
Baramati News
बारामती विमान अपघातात रेड बर्ड एविशनचा विमानाचा टायर निखळलाPudhari
Published on
Updated on

जळोची: बारामती विमानतळावरील वैमानिक प्रशिक्षण देणाऱ्या रेड बर्ड या कंपनीचा एक शिकावू विमानाचा टायर निखाळल्याची माहिती समोर आली आहे. बारामतीमध्ये शनिवारी (दि. ९) सकाळी १० च्या सुमारास हा अपघात झाला असल्याची चर्चा आहे.

पुढील टायर निखळल्याने हे विमान टॅक्सी रोड सोडून बाजूच्या गवतात गेल्याचे काही प्रत्यक्षदर्शनी व स्थानिक गावकऱ्यांनी सांगितले त्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने बाजूला घेत दुरुस्तीचे काम सुरू केले.

Baramati News
Solar Power Baramati: बारामती परिमंडळातील 15 हजार 460 ग्राहक ‘सौर’प्रकाशात

या संदर्भात समजलेली माहिती अशी विवेक यादव हे शिकाऊ वैमानिक विमान बारामती विमानतळवर उतरवत असताना अचानक समोरील चाकात बिघाड झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी एमर्जेसची लँडिंग करण्याचा प्रयत्न केला.

या प्रयत्नात विमानाच्या समोरील पंखाचे नुकसान झाले. काही भागाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत रेड बर्ड एविषनकडून कोणती अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. हा अपघात विमानतळाच्या धावपट्टी नजीक झाल्याने सुदैवाने काही जीवितहानी झाली नाही. यापूर्वी दोनदा रेड बर्डच्या शिकाऊ विमानाचे अपघात झाले होते.

Baramati News
Onion News: लाखोंचा कांदा सडला; शेतकर्‍यांच्या डोळ्यांत पाणी; आज ना उद्या भाव येईल’ या आशेने केली साठवणूक

त्यावेळेस डीजीसीए दिल्ली यांनी या कंपनीवर निर्बंध लागू केले. काही महिन्यापूर्वी हे निर्बंध उठवले व प्रशिक्षण सुरू झाले. दोन दिवसापूर्वी भाजपचे वैभव सोलंकर यांनी केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती. या अपघातावर स्थानिक रहिवासी चिंता व्यक्त करत आहेत. एमआयडीसी परिसरात अनेक कारखाने, शैक्षणिक संस्था आहेत. विमान दुर्घटना घडली तर मोठी हानी होऊ शकते. या संदर्भात सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news