पुणे : रायरेश्वरावर सहा रंगांची माती

रायरेश्वर पठारावर भवताल संस्थेच्या वतीने मातीची पाहणी करताना निरीक्षक. इन्सेट : मातीचे विविध रंग.
रायरेश्वर पठारावर भवताल संस्थेच्या वतीने मातीची पाहणी करताना निरीक्षक. इन्सेट : मातीचे विविध रंग.

पुणे : पुढारी वृत्तसेवा

छत्रपती शिवाजी महाराजांनी बालपणी रायरेश्वर पठारावर स्वराज्याची शपथ घेतली. त्याच पठारावर तब्बल सहा रंगांची माती आढळल्याची माहिती भवताल संस्थेचे संस्थापक आणि भूविज्ञानाचे अभ्यासक अभिजित घोरपडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भवताल संस्थेच्या वतीने या मातीची पाहणी करण्यात आली. त्या भागाच्या भूवैज्ञानिक रचनेनुसार मातीला हे रंग येण्यात तिथे असलेल्या जांभा खडकातील लोहाच्या खनिजांची भूमिका महत्त्वाची असल्याचे अभ्यासातून पुढे आले आहे. या अभ्यासासाठी घोरपडे यांच्यासह कार्यकर्ते पुष्कर चेडे, वनिता पंडित, वैभव जगताप यांचा सहभाग होता.

ती मिळणार्‍या ठिकाणाचे सर्वेक्षण करून 10 रंगछटांच्या मातीचे नमुने तंत्रशुद्ध पद्धतीने गोळा केले आहेत. या मातीमध्ये लालसर, फिकट तपकिरी, फिकट गुलाबी, फिकट जांभळी, पिवळसर छटा असलेली दोन वेगळ्या प्रकारची माती, गडद शेवाळी, पिवळसर शेवाळी, पिस्ता आणि दुधी या प्रकारांचा समावेश आहे.

इथे किती रंगांची माती होती, याबाबत अनेक मतप्रवाह आहेत. त्यामध्येही लाल, पिवळा, तपकिरी, जांभळा, शेवाळी आणि दुधी हे सहा रंग मात्र निश्चित असल्याचे संस्थेच्या अभ्यासातून पुढे आले आहे. या मातीत आणखी कोणत्या संयुगांचे अस्तित्व आहे याचा शोध घेण्यासाठी संस्था उपक्रमाचा पुढचा टप्पा राबविणार आहे. त्यात अत्याधुनिक प्रक्रियेचा अवलंब करण्यात येईल, असेही घोरपडे यांनी यावेळी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news