पिंपरी: अपुर्‍या कामांचा रस्त्यावरच राडारोडा

पिंपरी: अपुर्‍या कामांचा रस्त्यावरच राडारोडा

दापोडी, पुढारी वृत्तसेवा: जुनी सांगवी येथील पवारनगर गल्ली क्रमांक दोनच्या रस्त्याचे काम गेल्या सहा महिन्यांपासूनम रखडलेले आहे. गल्लीमध्ये राडारोड्याचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात खोदकाम केल्याने रस्ता चिखलमय झाला असून अक्षरशः विद्यार्थी, कामगार वर्ग, स्थानिक नागरिक, ज्येष्ठ नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन रस्त्यांवरुन जावे लागत आहे. ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे रस्त्याची दुरावस्था झाल्याने रस्तावर चालणे मुश्कील झाले असून, नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

त्याचप्रमाणे सांगवीतील प्रामुख्याने रहदारीच्या रस्त्यावरही अर्धवट कामे दिसत आहेत. खोदकामामुळे रस्ते खड्डेमय झाले आहेत. यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सुजित पोंगडे यांसह परिसरातील नागरिकांनी आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेऊन लवकरात लवकर सर्व कामे पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

logo
Pudhari News
pudhari.news