पुणे : राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाला मिळाले साडेसात कोटी!

पुणे : राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाला मिळाले साडेसात कोटी!

पुणे : कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाला 2022-23 या आर्थिक वर्षात प्रौढ, लहान मुले, परदेशी पर्यटक, असे मिळून तब्बल 22 लाख 5 हजार 664 पर्यटकांनी भेट दिली. त्यातून प्राणिसंग्रहालय प्रशासनाला 7 कोटी 61 लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे.
कोरोना काळातील दोन वर्षांच्या कालावधीत राजीव गांधी प्राणिसंग्रहालय बंद होते.

31 मार्च 2022 पासून पर्यटकांसाठी प्राणिसंग्रहालयाचे दरवाजे उघडण्यात आले. त्या वेळी प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव यांनी पर्यटकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले होते. त्यानंतर आत्तापर्यंत येथे पर्यटकांची विकेंडला मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. 2022-23 या कालावधीत 22 लाख 5 हजार 664 पर्यटकांनी येथे भेटी दिल्या. त्यांना केलेल्या तिकीट विक्रीतून प्रशासनाला 7 कोटी 61 लाख रुपये, तर बॅटरीवरील गाड्यांच्या माध्यमातून 23 लाख 70 हजार 130 रुपये, असे एकूण 7 कोटी 84 लाख 92 हजार 682 रुपये उत्पन्न मिळाले आहे.

बॅटरीवरील गाडीला प्रतिसाद
बॅटरीवरील गाडीचा वापर करणारे पर्यटक – 59 हजार 487
बॅटरीवरील गाडीद्वारे मिळालेले उत्पन्न – 23 लाख 70 हजार 130

प्राणिसंग्रहालय कोरोना काळात दोन वर्षे बंद होते. ते सुरू केल्यावर पर्यटकांमध्ये लक्षणीय वाढ पाहायला मिळाली. मध्यंतरीच्या काळात आम्ही प्राणिसंग्रहालयात प्राण्यांच्या नव्या प्रजाती आणल्या. त्यामुळे तर आता पर्यटकांचा प्रतिसाद आणखीनच वाढला आहे.

          – डॉ. राजकुमार जाधव, संचालक, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय, पुणे

पर्यटकांत प्रौढांची संख्या अधिक
प्रौढ – 17 लाख 97 हजार 379
लहान मुले – 3 लाख 46 हजार 231
परदेशी – 1 हजार 578
सरकारी शालेय सहलीतील मुले – 19 हजार 021
खासगी शालेय सहलीतील मुले – 38 हजार 846
दिव्यांग – 1 हजार 888
एकूण पर्यटक : 22 लाख 5 हजार 664
एकूण उत्पन्न : 7 कोटी 84 लाख 92 हजार 682 रुपये
पर्यटकांच्या कॅमेर्‍यामुळेही वाढला महसूल
व्हिडीओ कॅमेरा पर्यटक – 44
स्टील कॅमेरा पर्यटक – 2 हजार 210
व्हिडीओ कॅमेरा उत्पन्न – 9 हजार 600
स्टील कॅमेरा उत्पन्न – 1 लाख 10 हजार 500

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news