पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय गजबजले

पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय गजबजले
Published on
Updated on

धनकवडी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : कात्रज परिसरातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात सध्या पर्यटकांची गर्दी होत आहे. शाळा व महाविद्यालयांना उन्हाळ्याच्या सुट्या असल्यामुळे लहान मुले व युवक मोठ्या संख्येने उद्यानात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या एक एप्रिल ते नऊ मे या कालावधीत दोन लाख 62 हजार 109 पर्यटकांनी या प्राणिसंग्रहालयास भेट दिली आहे. यातून प्रशासनास सुमारे 89 लाख 99 हजार 185 रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.

महापालिकेचे असलेले हे प्राणिसंग्रहालय 130 एकरांत पसरलेले असून लगतच पेशवेकालीन ऐतिहासिक तलावाने परिसराच्या सौंदर्यात भर घातली आहे. प्राणिसंग्रहालयात आशियाई सिंह, पट्टेरी वाघ, हत्ती, अस्वल, जाळीदार अजगर असे सुमारे 430 प्राणी आहेत. यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांसह देश व विदेशातील पर्यटक या ठिकाणी भेटी देतात.

सध्या उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने हे स्थळ पर्यटकांनी गजबजून गेले आहे. प्राणिसंग्रहालयाची वेळ सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेसहा अशी आहे. बॅटरीवर चालणारी वाहने, सुलभ शौचालय, दिव्यांगांसाठी व्हीलचेअर, पार्किंगची सुविधा प्राणिसंग्रहालयातर्फे पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे प्रशासकीय अधिकार्‍यांनी सांगितले.

तरस, चौसिंगा, पांढरा वाघ या तीन प्रजातींचे प्राणी लवकरच प्राणिसंग्रहालयामध्ये पाहण्यासाठी पर्यटकांना मिळतील. या प्राण्यांसाठी खंदकाचे कामकाज जवळपास पूर्ण होत आले आहे.
                                                    – डॉ. राजकुमार जाधव,
                                  संचालक, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय, कात्रज

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news