Rajgad Taluka Election: राजगड तालुक्यात दुबार मतदान रोखण्यासाठी कडक उपाययोजना

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीत पारदर्शकतेसाठी प्रशासन सज्ज; 821 दुबार मतदारांवर विशेष लक्ष
Rajgad Taluka Election
Rajgad Taluka ElectionPudhari
Published on
Updated on

वेल्हे: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजगड तालुका निवडणूक कार्यालयाच्या वतीने मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक, निष्पक्ष व विश्वासार्ह राहावी, यासाठी कडक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. दुबार मतदानाचा कोणताही प्रकार घडू नये, यासाठी संपूर्ण निवडणूक यंत्रणेला सतर्क राहण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

Rajgad Taluka Election
Maharashtra Sahitya Parishad Election: महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कारभार अधिक पारदर्शक करणार : योगेश सोमण

मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदाराची ओळख काटेकोरपणे तपासली जाणार आहे. मतदार यादीतील नोंद तपासणे, वैध ओळखपत्राची खातरजमा करणे तसेच बोटावर अमिट शाई लावण्याची प्रक्रिया अत्यंत दक्षतेने राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेत कोणतीही ढिलाई होऊ नये, यासाठी मतदान केंद्रांवरील अधिकारी व कर्मचारी यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी पूर्ण सजगतेने पार पाडावी, असेही आदेश देण्यात आले आहेत.

Rajgad Taluka Election
Mumbai Pune Expressway: मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर खोळंबा, प्रवाशांसाठी तीन पर्यायी मार्ग जाणून घ्या

निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणतीही संशयास्पद बाब आढळून आल्यास तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दुबार मतदानाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींवर निवडणूक कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

राजगड तालुक्यात 821 दुबार मतदार आहेत. या पार्श्वभूमीवर कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासह आवश्यक ती दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Rajgad Taluka Election
Mayuri Kokate Victory: पाषाण–सुस प्रभागात मयुरी कोकाटे यांचा दणदणीत विजय; 100 दिवसांचा विकास आराखडा जाहीर

यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी अमिता तळेकर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसलीदार निवास ढाणे यांनी मतदारांना आवाहन करताना सांगितले की, मतदारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे, प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने मतदान करावे. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराचा सहभाग महत्त्वाचा आहे. शांततेत, नियमबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी सजग व जबाबदार मतदारांची भूमिका अत्यंत आवश्यक असल्याचेही निवडणूक कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Rajgad Taluka Election
Pune Municipal Elction Analysis: वानवडी प्रभागात काँग्रेस–भाजपमध्ये काँटे की टक्कर; प्रशांत जगतापांनी सिद्ध केला बालेकिल्ला

ज्या मतदारांची नावे दोन ठिकाणी आहेत, त्यांना प्रशासनाने एक संधी दिली आहे. संबंधित मतदारांनी आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडे (इङज) संपर्क साधावा. परिशिष्ट-1 मध्ये लेखी माहिती देऊन आपण नेमके कोणत्या केंद्रावर मतदान करणार आहोत, हे स्पष्ट करावे. प्रशासनाच्या या कठोर भूमिकेमुळे बोगस मतदानाला चाप बसण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news