पुणे : मध्य महाराष्ट्र, कोकणात पावसाचा अंदाज

मुंबईत पावसाचा जोर
मुंबईत पावसाचा जोर
Published on
Updated on

पुणे : राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पुढील दोन दिवस पाऊस पडणार असून, विदर्भाच्या काही भागांतच पाऊस हजेरी लावेल, तर मराठवाड्यात मात्र उघडीप राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पुढील दोन दिवस राज्यात मध्य महाराष्ट्र विशेषत: घाट माथा, तसेच कोकणच्या बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसणार आहे.

ऑरेज अलर्ट (15 ते 16 सप्टेंबर)
पालघर, ठाणे, रायगड, नाशिक,
पुणे (घाटमाथा)
यलो अलर्ट (15 ते 17 सप्टेंबर)
ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक, पुणे, सातारा, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news