

पुणे: राज्यातील 95 टक्के भागातून पाऊस शनिवार (दि. 30) पासून थांबणार आहे. फक्त पुणे, कोल्हापूर, सातारा घाटमाथा आणि पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांत मंगळवार, दि. 2 सप्टेंबरपर्यंत पाऊस राहणार आहे.
राज्यात 15 ऑगस्टपासून पाऊस सुरू आहे. हलका ते मध्यम आणि मुसळधार अशा स्वरूपाचा हा पाऊस होता. प्रामुख्याने कोकणात मुसळधार, तर मराठवाड्यात दोनवेळा पूरस्थिती निर्माण झाली. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही चांगला पाऊस झाला. (Latest Pune News)
15 ते 29 ऑगस्ट असा 15 दिवस बरसून तो काही दिवस विश्रांती घेत आहे. त्यामुळे 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत राज्यात पावसाचा खंड राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
...असे आहेत ‘यलो अलर्ट’
पुणे, सातारा, कोल्हापूर घाट, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग (30 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर). परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार (30 ऑगस्ट).