

तळेगाव (पुणे): तळेगाव दाभाडे परिसरात बुधवार १३ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली होती. अचानक सुरु झालेल्या तुफान वादळ ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाटाने परिसर दणानून गेला. हे वातावरण रात्री उशिरापर्यंत होते. यामुळे नागरिकांची एकच धांदल उडाली. काही काळ जनजीवन विस्कळीत झाले.
वादळामुळे अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडाले. तसेच वीज वाहीन्यांवर पडलेल्या झाडांच्या फांद्या आणि बॕनरमुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडीत झाला. वीज कर्मचारी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रतिकुल परिस्थितीत प्रयत्न करीत होते.