पुणे : राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांत गेल्या पंधरा दिवसांपासून पडत असलेला मुसळधार पाऊस आता पूर्णपणे कमी झाला आहे. काही भागांत पाऊस हजेरी लावत असला तरी त्याची तीव्रता कमी आहे. राज्यात १७ सप्टेंबरपर्यंत हलका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हवामान विभागाच्या वतीने किमान यलो अलर्ट तरी जारी करण्यात येत असतो. मात्र सध्या पाऊस पडण्यास कोणतीही स्थिती अनुकूल नसल्यामुळे पावसाची तीव्रता कमी झाली आहे. दरम्यान, दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत वाऱ्यांची द्रोणीय स्थिती आहे. त्याचा परिणाम पाऊस वाढण्यावर होण्याची चिन्हे कमी आहेत.