रेल्वेवर दगड का मारता ? ‘वंदेभारत’ही सुटली नाही; जनजागृतीपर कार्यक्रम वाढविण्याची गरज

रेल्वेवर दगड का मारता ? ‘वंदेभारत’ही सुटली नाही; जनजागृतीपर कार्यक्रम वाढविण्याची गरज
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  रेल्वे गाड्यांवर दगडफेकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, यामध्ये अनेकदा प्रवासी गंभीररीत्या जखमी झाल्याचे समोर आले आहे. यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज असून, रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) पुढाकार घेऊन जनजागृतीपर कार्यक्रमांमध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे. पुण्यातून दररोज लाखो प्रवासी ये-जा करतात. त्यांना घेऊन अनेक एक्स्प्रेस, मेल एक्स्प्रेस, लोकल गाड्या धावत असतात. मात्र, त्याचवेळी रेल्वे ट्रॅक शेजारी राहणार्‍या लोकांकडून विशेषत: लहान मुलांकडून रेल्वे गाड्यांवर अनेकदा दगडफेक केली जाते. अशा रेल्वे ट्रॅक शेजारी राहणार्‍या नागरिकांच्या वसाहतींमध्ये जाऊन रेल्वे सुरक्षा दलाने सातत्याने जनजागृती करणे गरजेचे आहे.

पुणे रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेबाबत मनसेचे निवेदन
पुणे रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेसंदर्भात वाढ करा, या मागणीसाठी अनेकदा रेल्वेच्या पुण्यातील विभागीय कार्यालयात मागणी करण्यात आली. मात्र, त्याची दखल अद्याप घेण्यात आली नाही. त्यामुळे मनसे, पुणे स्टेशन शाखेच्या वतीने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांना रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या मागणीचे निवेदन मुंबईत देण्यात आले. महाव्यवस्थापकांच्या वतीने हे निवेदन त्यांचे सचिव जि. रा. कुशवाह आणि उमंग दुबे यांनी स्वीकारले. या वेळी मनसेचे अनिल परदेशी, शिवाजी सुवर्णकाळ, संतोष गवळी, आकाश भोसले, मोहन पांढरे उपस्थित होते.

आठ दिवसांत दोनवेळा प्रकार
यापूर्वी रेल्वेच्या शताब्दी, सिंहगड आणि महाराष्ट्र एक्स्प्रेससह अनेक रेल्वे गाड्यांवर दगडफेक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच आता नव्याने रेल्वे प्रशासनाच्या ताफ्यात दाखल झालेल्या 'वंदेभारत' या नव्या एक्स्प्रेस गाडीवरही दगडफेक करण्यात आली आहे. त्यात महत्त्वाचे म्हणजे मुंबई ते सोलापूरदरम्यान धावणार्‍या वंदेभारत एक्स्प्रेसवर पुणे विभागात आठ दिवसांत दोन ठिकाणी दगडफेक झाल्याचे समोर आले आहे. रेल्वेच्या पुणे विभागात पुणे-लोणावळा आणि पुणे-दौंड मार्गावर सातत्याने दगडफेक होत असते. यात लोणावळा मार्गावर तळेगाव, पिंपरी, चिंचवड, कासारवाडी, आकुर्डी आणि
शिवाजीनगर याठिकाणी, तर दौंड मार्गावर घोरपडी, लोणी, मांजरी, उरुळी, यवत आणि कराड या ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडतात.

दगडफेकीच्या घटनांबाबत आम्हाला माहिती मिळाली आहे. याबाबत आम्ही रेल्वे सुरक्षा आयुक्तांशी चर्चा केली आहे. रेल्वे ट्रॅक शेजारी
राहणार्‍या वसाहतींमधील लहान मुले अशाप्रकारे दगडफेक करत असल्याचे निदर्शनास आले आहे. योग्य उपाययोजना करण्यात येतील.
                                  इंदू दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे विभाग.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news