रेल्वेने जायचे म्हटले तर आम्हाला नेहमी गर्दीचाच सामना करावा लागतो. स्लीपर डब्यामध्ये अनेकदा आम्हाला जनरल डब्यातून प्रवास केल्याचा अनुभव येतो आणि ऑनलाइन तिकीट बुक करायला गेलो, तर 200 ते 300 प्रवाशांचे वेटिंग समोर येते. तसेच, हे वेटिंग पुढील तीन-तीन महिन्यांपर्यंत असते. त्यामुळे अनेकदा तिकीट काढूनही कन्फर्म न झाल्यामुळे आम्हाला प्रवास थांबवावा लागतो. त्यामुळे यावर रेल्वे प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात आणि गाड्यांच्या संख्येत वाढ करावी, असे प्रवासी रवी मेंगडे यांनी दै.'पुढारी'शी बोलताना सांगितले.