Radhamohan Mishra Case: भोंदू मिश्रा भक्तांकडून लिहून घ्यायचा ‘माईंड रिपोर्ट’; मीच खरा पुरुष, स्त्रियांची जागा चप्पलजवळ

नरकाची दाखवायचा भीती
Radhamohan Mishra Case
Radhamohan Mishra CasePudhari
Published on
Updated on

पुणे: ईश्र्वराचा अवतार असल्याचे सांगून तरुणीवर लैंगिक अत्याचार करणारा भोंदू राधामोहन मिश्रा हा आपल्या प्रत्येक भक्त आणि त्यांच्या मुलांकडून मनाचा रिपोर्ट लिहून घेत असे. जर त्यांनी त्यामध्ये काही खोटे लिहिले तर तो त्यांना नरकात जाण्याची भीती दाखवत होता. त्यामुळे अनेक भक्तांनी आणि त्यांच्या मुलांनी आपल्या आयुष्यात काय चालले आहे, ते बाबाला लिहून दिले होते.

दरम्यान, त्याच रिपोर्टचा गैरफायदा घेत मिश्रा कधी तो रिपोर्ट आश्रमात वास्तव्यास असलेल्या मुलांच्या आई-वडिलांना दाखवण्याची धमकी देत असे. पीडित तरुणीबाबतही त्याने असेच केले. जेव्हा तरुणीने मिश्राच्या कृत्याबद्दल आपल्या कुटुंबीयांना सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने तरुणीने लिहून दिलेल्या मनाच्या रिपोर्टमधील काही गोष्टी त्यांना सांगून ती कशी बिघडली आहे, हे दर्शविण्याचा प्रयत्न केला. कालांतराने त्याचा तो उद्देश देखील सफल झाला. त्यातूनच त्याने कित्येक वर्षे तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिचा शारीरिक, मानसिक छळ केला.

Radhamohan Mishra Case
Pune Water Supply: दिवसाआड पाणीपुरवठ्याचा फज्जा; कमी दाब, उशिरा व गढूळ पाणीपुरवठ्याने नागरिक हैराण

सध्या हा भोंदू मिश्रा खराडी पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याचा साथीदार स्वमी कंवल नयन याच्यासह सहा महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मिश्राच्या आश्रमात पोलिसांना अनेक अक्षेपार्ह गोष्टी मिळून आल्या आहेत.

मिश्रा आपल्या भक्तांना मीच खरा पुरुष आहे, असे सांगत असे. तर तो स्त्रियांची जागा चप्पलेजवळ असल्याचे बोलत होता. त्यामुळे अनेक व्यक्ती त्याच्या खोटारड्या भक्ती मार्गाच्या जाळ्यात अडकले असल्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने देखील पोलिस तपास करीत आहेत.

यूपी, हरियाणा ते पुण्यात बस्तान

राधामोहन मिश्रा हा मूळचा उत्तर प्रदेशातील आहे. तो अतिशय चलाख आहे. पोलिसांना तो आपली पूर्ण माहिती सांगत नाही. ४० वर्षांपूर्वी त्याने आपले घर सोडले असून, आपल्या कुटुंबासोबत आपला संपर्क नाही, असे तो म्हणतो. उत्तर प्रदेशातून मिश्रा हरियाणात आला. त्याने सुरुवातीला कंवल नयनच्या साथीने मोरणी हिल्स पंचकुला येथे गुरूदेव साधना धाम ट्रस्ट हा आश्रम सुरू केला.

तरुणीच्या वडिलांना आपल्या श्रद्धेच्या जाळ्यात ओढल्यानंतर मिश्राने इतर दोन आश्रम मॉडर्न गुरूकुलच्या नावाने सुरू केले. कालांतराने ते बंद पडले. त्यानंतर त्याने पुण्याची वाट धरली. त्यासाठी तरुणीच्या वडिलांचा वापर केला. दोघांत मिळून खराडी-उबाळेनगर येथे आश्रमाची जागा खरेदी करून बांधकाम केले. मिश्राची 60 टक्के, तर तरुणीच्या वडिलांची त्यामध्ये ४० टक्के भागिदारी असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

Radhamohan Mishra Case
Housing Society STP Projects: सोसायट्यांमधील एसटीपी ऑडिटचा पत्ताच नाही; ४३६ खासगी एसटीपींचे भवितव्य अंधारात

चोरी करण्यास भाग पाडले

भोंदू मिश्राने तरुणीला तिच्याच वडिलांच्या खोलीत चोरी करण्यास भाग पाडले. तरुणीला पूर्णपणे त्याने आपल्या नियंत्रणात ठेवले होते. वडिलांच्या कपाटातून तरुणीने पैसे, कागदपत्रांची चोरी केली. मिश्राने त्याच कागदपत्रांचा वापर करून तरुणीच्या नावावर असलेली मालमत्ता आपल्या नावावर करून घेतली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news