Pune : मुळशीत पेट्रोल पंपावर रांगा

Pune : मुळशीत पेट्रोल पंपावर रांगा
Published on
Updated on

पौड : पुढारी वृत्तसेवा : वाहतूकदारांचा संप सुरू झाल्याने मुळशी तालुक्यात आपल्या वाहनांमध्ये पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी वाहनचालकांनी मोठी गर्दी केली होती. वाहतूकदारांचा विविध मागण्यांसाठी राज्यात संप सुरू झालेला आहे. यामध्ये पेट्रोल व डिझेल वाहतूकदाराचाही समावेश होऊ शकतो, याचा अंदाज आल्याने सर्व दुचाकी तसेच चारचाकी वाहन चालकांनी पेट्रोल तसेच डिझेल भरण्यासाठी पंपावर गर्दी केली. घोटावडे फाटा येथील वाडकर पेट्रोलियमवर सोमवारी (दि. 1) रात्री आठ वाजता 200 पेक्षा जास्त दुचाकी रांगेत पेट्रोल भरण्यासाठी उभ्या होत्या. काही पंपावर पेट्रोल संपल्याचे बोर्ड लागले होते. आपल्या गाडीत पेट्रोल भरण्यासाठी वाहनचालकांना पंपावर एक तास वाट पहावी लागली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news