Purandar Toll Concession NH965: पुरंदरकरांना दिलासा! तक्रारवाडी टोलनाक्यावर २० किमी परिसराला सवलत

एनएच-९६५वर मासिक ३५० रुपयांचा पास; जेजुरी शहरांतर्गत उड्डाणपूल प्रस्तावित
Toll plaza
Toll plazaPudhari
Published on
Updated on

जेजुरी: पुणे-पंढरपूर पालखी महामार्ग म्हणजे राष्ट्रीय महामार्ग क्र.965 वर तक्रारवाडी (ता. पुरंदर) या फाट्यावर होणाऱ्या टोलनाक्यावर 20 किलोमीटर अंतरावरील गावांतील ग््राामस्थांना सवलत देण्यात येणार आहे.

Toll plaza
Chimbali Power Cut Issue: चिंबळीत वारंवार वीजपुरवठा खंडित; संतप्त नागरिकांचा महावितरणला इशारा

याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणे विभागाचे प्रकल्प अधिकारी संजय कदम, अभिजित आवटे यांनी माहिती दिली. याबाबत संभाजी बिगेडचे शहराध्यक्ष संदीप जगताप, माजी प्रमुख विश्वस्त शिवराज झगडे, राष्ट्रवादी काँग््रेासचे जेजुरी शहराध्यक्ष रमेश लेंडे, बहुजन हक्क परिषदेचे शहराध्यक्ष यशवंत दोडके यांनी सासवड-जेजुरी राष्ट्रीय महामार्गावर तक्रारवाडी फाट्याजवळ नव्याने झालेल्या टोलनाक्यावर पुरंदरमधील नागरिकांना टोलमाफी-सवलत मिळावी, याबाबत निवेदने देत पाठपुरावा केला.

Toll plaza
Baramati Majhi Vasundhara Abhiyan Award: ‘माझी वसुंधरा अभियान 5.0’मध्ये बारामतीचा पुन्हा राज्यात पहिला क्रमांक

यावेळी प्रकल्प अधिकारी संजय कदम, अभिजित आवटे यांनी शुक्रवारी (दि. 20) पुणे येथील कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती नीलेश जगताप, रमेश लेंडे, शिवराज झगडे, यशवंत दोडके, संदीप जगताप आदी उपस्थित होते. तक्रारवाडी फाट्यावरील टोलनाका बेलसर गावच्या हद्दीत येतो. मार्चअखेरीपर्यंत हा टाल सूर होणार आहे. पुरंदरमधील 20 किलोमीटर परिसरातील नागरिकांना 350 रुपयांचा मासिक पास देण्यात येणार आहे. त्यातून त्यांना कितीहीवेळा ये-जा करता येणार आहे.

Toll plaza
Cooperative Lift Irrigation Loan Waiver: उपसा जलसिंचन योजनांचे कर्जमाफीमध्ये समावेश करा; हजारो शेतकरी कर्जाच्या विळख्यात

त्यासाठी आधारकार्ड आणि फास्ट टॅग ऑनलाईन करून घ्यावे लागणार आहे. केंद्र शासनाच्या धोरणानुसार 3 हजार रुपयांचा वार्षिक पास घेतल्यास प्रत्येक टोलनाक्यावर फक्त 15 रुपये फास्टटॅगमधून वजा होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जेजुरी शहरांतर्गत राष्ट्रीय महामार्गावरील बंद असलेले पथदिवे 15 दिवसांमध्ये सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली. तसेच टोलनाका सुरू करण्यापूर्वी पुन्हा एकदा बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचेही सांगण्यात आले.

Toll plaza
MSRTC NCMC Card Mandatory: एसटी सवलतींसाठी आता एनसीएमसी कार्ड अनिवार्य; महिलां- ज्येष्ठांना मोठा बदल

जेजुरीअंतर्गत उड्डाणपूल प्रस्तावित

सासवडनजीक बोरावके मळा येथून येणारा बाह्यवळण मार्ग येथे उड्डाणपूल प्रस्तावित आहे. तसेच तसेच जेजुरी शहरांतर्गत राष्ट्रीय महामार्गावर विशेषतः कडेपठार कमान ते छत्रपती शिवाजी महाराज चौक-डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते आनंदनगर याअंतर्गत मार्गावर उड्डाणपुलाशिवाय पर्याय नसल्याची बाब पुढे येत आहे. काही काळातच जेजुरी शहरांतर्गत एक पिलरवर उभा असलेला उड्डाणपूल निर्माण होणार असल्याची माहिती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news