Purandar Airport Plotting Survey: पुरंदर विमानतळानजीकच्या प्लॉटिंगचे सर्व्हेक्षण सुरू; अनधिकृत विकासावर कारवाईची तयारी

विमानतळाच्या हालचालींमुळे वाढले जमिनीचे भाव; पीएमआरडीएकडून सर्व्हे करून अनियमित प्लॉटिंगवर लक्ष
पुरंदर विमानतळानजीकच्या प्लॉटिंगचे सर्व्हेक्षण सुरू
पुरंदर विमानतळानजीकच्या प्लॉटिंगचे सर्व्हेक्षण सुरूPudhari
Published on
Updated on

पिंपरी : पुण्यालगत पुरंदर तालुक्यात नवे विमानतळ उभारण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासानकडून सुरू आहेत. दरम्यान, नव्या विमानतळाच्या निर्णयानंतर या परिसरातील जागांचे दर गगनाला भिडले आहेत. या परिसरात होणारे अवैध व अनिधकृत प्लॉटिंग रोखणे, नागरिकांची फसवणूक होऊ नये, यासाठी प्लॉटिंगचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. यामध्ये अनियमितता आढळल्यास पीएमआरडीएच्या वतीने संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.(Latest Pune News)

पुरंदर विमानतळानजीकच्या प्लॉटिंगचे सर्व्हेक्षण सुरू
Guava Price Crash: पेरूचे दर घसरले; शेतकऱ्यांचा तोट्यामुळे हवालदिल

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणअंतर्गत पुरंदर तालुक्यात 15 गावांचा समावेश आहे. त्यातील 3 गावांचे नियोजित विमानतळासाठी भूसंपादन केले जाणार आहे. दरम्यान, आणखी जवळपास दीडशे हेक्टर जमिनीचे नव्याने भूसंपादनाची कार्यवाही जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. याबाबत प्रक्रिया सुरू असतानाच, विमानतळाच्या नावाखाली या परिसरात प्लॉटिंग व्यवसाय वाढू लागला आहे. त्यामुळे या टप्प्यातील जमिनीचे भावदेखील वाढले आहेत. अशावेळी नागरिकांची फसणवूक होण्याची शक्यता आहे. तसेच, याबाबत जिल्हा प्रशासनाकडे स्थानिकांनी तक्रारी केल्या आहेत.

पुरंदर विमानतळानजीकच्या प्लॉटिंगचे सर्व्हेक्षण सुरू
Baramati Crime: नोकरी, लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार, बारामतीच्या उद्योजकाविरुद्ध गुन्हा दाखल

दरम्यान, यापूर्वीच पीएमआरडीए प्रशासनाकडून या ठिकाणी सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. या परिसरातील प्लॉटिंगची तपासणी करण्यात येत आहे. अनधिकृत अथवा विनापरवाना सुरू असलेल्या प्लॉटिंगवर नोटिसा काढण्यात येणार असून, कारवाई देखील करण्यात येणार आहे. सर्व्हेक्षणासाठी पीएमआरडीएच्या अतिक्रमणविरोधी पथकातील अधिकारी व कर्मचारी दोन दिवसांपासून या गावांच्या दौऱ्यावर आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news