पुनित बालन ग्रुप आयोजित संयुक्त दहीहंडी होणार डीजेमुक्त साजरी; ढोल ताशा, बँड, वरळी बीट्सचे पारंपरिक वाद्य वाजणार

महाकालचा कार्यक्रम ठरणार मुख्य आकर्षण
DJ-free Dahi Handi
पुनित बालन ग्रुप आयोजित संयुक्त दहीहंडी होणार डीजेमुक्त साजरी; ढोल ताशा, बँड, वरळी बीट्सचे पारंपरिक वाद्य वाजणारPudhari
Published on
Updated on

DJ-free Dahi Handi

पुणे: शहरातील 23 नामांकित सार्वजनिक गणेश मंडळाची पुनित बालन ग्रुप आयोजित संयुक्त दहीहंडी यंदा डीजेमुक्त साजरी केली जाणार आहे. डीजे न लावता पारंपरिक ढोल ताशांसह प्रभात बॅन्ड, मुंबईतील नामांकित वरळी बीट्स यांच्या वाद्य संगीताच्या तालावर यंदाची दहीहंडी फोडली जाणार असल्याची माहिती पुनित बालन ग्रुपचे अध्यक्ष व युवा उद्योजक पुनित बालन यांनी दिली.

छत्रपती शिवाजी रस्त्यावरील ऐतिहासिक लाल चौकात गतवर्षीपासून पुनित बालन ग्रुपच्या माध्यमातून संयुक्त दहीहंडी उत्सव सुरू करण्यात आला आहे. प्रामुख्याने चौका चौकात होणार्‍या दहीहंडी कार्यक्रमांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि सुरक्षाव्यवस्थेमुळे पोलिस यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी बालन यांनी या संयुक्त दहीहंडीसाठी पुढाकार घेतला होता.  (Latest Pune News)

DJ-free Dahi Handi
Pune Housing: हिंजवडी, वाघोलीतील घरं महागडी; मुंबईतील चेंबूर, मुलुंड मधील घरे देशात महाग

त्याला प्रतिसाद देत पहिल्याच वर्षी 35 मंडळांनी एकत्र संयुक्त दहीहंडी साजरी केली होती. आता पुन्हा सलग दुसर्‍या वर्षी ही संयुक्त दहीहंडी साजरी केली जाणार आहे. मात्र, या वर्षी पुनित बालन यांनी डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे यंदाच्या दहीहंडीत उत्सवातही डीजे न लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यंदा पारंपरिक वाद्यांच्या गजरात दहीहंडी फोडली जाणार आहे.

त्यानुसार दहीहंडीला सुरवातीला युवा वाद्य पथक, समर्थ पथक, रमणबाग आणि शिवमुद्रा यांचे ढोलवादन होणार आहे, त्यानंतर प्रभात बॅन्डचे वादन होणार आहे. त्यानंतर मुंबईतील प्रसिद्ध बँजो वरळी बीट्स यांच्या संगीत तालावर दहीहंडी फोडली जाणार आहे. या सर्व कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे उज्जैन येथील पारंपरिक शिव महाकाल हा कार्यक्रम या वेळी होणार असल्याची माहिती पुनित बालन यांनी दिली.

DJ-free Dahi Handi
Baramati Politics| शरद पवारांनी कोणावरही आरोप केला नाही: सुप्रिया सुळे

संयुक्त दहीहंडीत सहभागी होणारी मंडळे ?

  • श्रीमंत पेशवे गणपती मंदिर

  • श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट

  • श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट

  • श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट

  • पुण्येश्वर महादेव मंदिर उत्सव समिती

  • श्री गरुड गणपती (लक्ष्मी रोड)

  • उदय तरुण मंडळ (एफसी रोड)

  • नागनाथ पार सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्ट

  • मुंजाबा तरुण मंडळ (पीएमसी)

  • फणी आळी तालीम ट्रस्ट

  • प्रकाश मित्रमंडळ

  • भरत मित्रमंडळ

  • त्वष्टा कासार समाज संस्था

  • आझाद हिंद मंडळ (जे. एम. रोड)

  • श्री शिवाजीनगर सार्वजनिक गणेशोत्सव

  • श्री हनुमान मंडळ प्रतिष्ठान

  • जनता जर्नादन मंडळ प्रतिष्ठान

  • जनता जनार्दन मंडळ

  • क्रांतिवीर राजगुरू मित्रमंडळ

  • गणेश मित्र मंडळ (अलका चौक)

  • भोईराज मित्र मंडळ

  • शिवतेज ग्रुप

  • नटराज ग्रुप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news