

पुणे: जून महिन्याच्या सुरुवातीला पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर महाराष्ट्र प्रीमियर लीग व वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धांचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेच्या एमपीएलसाठी पुणरी बाप्पा हा संघ तर डब्लूएमपीएलसाठी पुणे वॉरियर्सचा संघ सज्ज झाला आहे, अशी माहिती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार आणि सचिव कमलेश पिसाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पवार म्हणाले, पुरुष आणि महिलांची महाराष्ट्र प्रिमियर लीगची सुरुवात दि. 5 जुन पासून गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानावर होणार आहे. बुधवार दि. 4 जुन रोजी सायंकाळी स्पर्धेचे उद्घाटन रत्नागिरी जेट्स आणि ईगल नाशिक टायटन्स यांच्यातील टी-20 सामन्याने होणारअ सून त्यापुर्वी ड्रोन शो, सेलिब्रिटीजचे सादरीकरण होणार आहे. एमपीएलचा अंतिम सामना दि. 14 जुन रोजी तर डब्लूएमपीएलचा अंतिम सामना दि. 22 जून रोजी होणार आहे.
महाराष्ट्र प्रीमियर लीगमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील सर्वसामान्य कुटुंबातील अनेक नवोदित खेळाडूंना योग्य वेळी संधी मिळत आहे. या स्पर्धेमुळे त्यांच्यासाठी भविष्यातील अनेक दरवाजे उघडले आहेत. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे (एमसीए) राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला क्रिकेटच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रत्येकी 75 लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यात क्रिकेट सुविधांचा विकास करून महाराष्ट्र क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी एमसीए कटिबद्ध आहे. या स्पर्धेमुळे राज्याच्या कानाकोपर्यात असलेल्या गुणवान क्रिकेटपटूंना राष्ट्रीय स्तरावर येण्यासाठी संधी मिळणार आहे.
या वर्षीच्या महाराष्ट्र प्रीमियर लीग व वुमन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग लिलावासाठी एकूण 409 पुरुष खेळाडू आणि 249 महिला खेळाडू नोंदणीकृत होते. ज्यामधून संघमालकांनी आपापल्या संघाचा बॅलन्स व गरजांनुसार संघासाठी खेळाडूंची निवड केली. या हंगामात एमपीएल मध्ये 6 संघ आणि डब्लूएमपीएल मध्ये 4 संघ सहभागी झाले आहेत.
ः 1) 4 एस पुणेरी बाप्पा, 2) पीबीजी कोल्हापूर टस्कर्स, 3) रत्नागिरी जेट्स, 4) ईगल नाशिक टायटन्स, 5) सातारा वॉरियर्स, 6) रायगड रॉयल्स. डब्लूएमपीएल 2025 सहभागी होणारे संघ ः 1) पुणे वॉरियर्स, 2) रत्नागिरी जेट्स, 3) सोलापूर स्मॅशर्स, 4) रायगड रॉयल्स.