पुणेकर पर्यटनासाठी ’टेक ऑफ मोड’वर

पुणेकर पर्यटनासाठी ’टेक ऑफ मोड’वर
Published on
Updated on

प्रसाद जगताप

पुणे : मुलांच्या परीक्षा संपत आलेल्या आणि उन्हाळी सुटी खुणावू लागल्यामुळे पुणेकरांना वेध लागले आहेत आता सहलींचे. त्यामुळे या आणि पुढच्या (एप्रिल आणि मे) महिन्यातील प्रवासाचे आरक्षण करण्यात सध्या ते गर्क असून, आता ते 'टेक ऑफ मोड'वर आहेत. परिणामी, राज्यातील, देशातील पर्यटनस्थळे फुल होण्याच्या मार्गावर आहेत.

देशात उत्तर भारत, दक्षिण भारतासह परदेशात ग्रेट ब्रिटन, जपान, दुबई, मॉरिशस, सिंगापूर आणि युरोपातील देशांमध्ये जाण्यासाठी पर्यटकांचा ओढा वाढत असल्याचे दिसत आहे. तसेच राज्यात महाबळेश्वर, माथेरान, भीमाशंकर, लोणावळा, माळशेज घाट, भोर-वेल्हा, मुळशीकडे पर्यटकांची गर्दी वाढत आहे.

या वाढत्या पर्यटकांच्या गर्दीमुळे रेल्वे, विमान, एसटी, खासगी बस, खासगी वाहनांना गर्दी वाढत असल्याचे दिसत आहे. मार्च महिना संपल्यावर शाळांना, कार्यालयांना उन्हाळी सुट्या लागतात. याच सुट्यांचा फायदा घेत अनेकजण पर्यटनासाठीचे बेत आखून घराबाहेर पडण्याला पसंती देत असतात. मार्च महिना संपल्यामुळे असाच काहीसा बेत आखून सध्या पुणेकर

  • रेल्वे, एसटी, विमान, खासगी बसला वाढतेय गर्दी, देश, परदेशाला जाण्यास पसंती

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) पुणे विभागांतर्गत असलेल्या रिसॉर्टला पर्यटकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. यात थंड हवेच्या ठिकाणी असलेले रिसॉर्टला सर्वाधिक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते. महाबळेश्वर, भीमाशंकर, माथेरान, कोयना, माळशेज घाट, पानशेत याठिकाणी असलेले सर्व रिसॉर्ट सुमारे 90 टक्क्यांपर्यंत फुल झाले आहेत.

                                         -मोशमी कोसे, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी, पुणे.

सध्या पर्यटकांचा रेल्वे पॅकेजच्या सुविधांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. दक्षिण भारतातील पॅकेजस फुल झाली आहेत. जगन्नाथपुरी, वाराणसी, भुवनेश्वर, प्रयागराज यासाठी असलेली पॅकेजससुध्दा आठ दिवसांतच फुल झाली आहेत. देशात थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी पर्यटकांचा सर्वाधिक ओढा आहे. उत्तर भारत दर्शनासाठी सुरू केलेले पॅकेज 4 दिवसांतच 60 टक्क्यांपेक्षा अधिक बुकिंग झाले आहे.

                            – रविकांत जंगले, टुरिझम मॅनेजर, आयआरसीटीसी
                        (इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन), मुंबई

मार्च महिन्यातील 10 तारखेपासून प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत, ज्यादा वाहतूक सुरू करण्यात आली आहे. सोलापूर, गाणगापूर, तुळजापूर, कोकण भागात, गणपतीपुळेसाठी ज्यादा गाड्या धावत आहेत. तसेच, थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर येथे जाण्यासाठी प्रवाशांचा प्रतिसाद वाढला आहे. त्यामुळे आम्ही येथे जाणार्‍या गाड्या वाढविल्या असून, प्रवाशांना अर्ध्या तासाला स्वारगेट येथून गाडी उपलब्ध आहे. यासोबतच सुट्यांमध्ये गावी जाण्यासाठीसुध्दा गर्दी झालेली असून, अक्कलकोट, बारसी, सांगोला, यासह अन्य भागांमध्ये गाड्या वाढविल्या आहेत.

                                 – प्रदीप इंगवले, एस. टी. स्थानकप्रमुख, स्वारगेट

देश, परदेश आणि स्थानिक अशा ठिकाणी असलेल्या पर्यटनस्थळांची सफर करण्यासाठी पुणेकरांची बुकिंग वाढत आहे. बजेट आणि वेळेनुसार नागरिक आपल्या पर्यटनस्थळांची निवड करत आहेत. सध्या विमानाची तिकिटे व अन्य बुकिंगचे दर वाढले आहेत. मात्र, त्याचा कोणताही परिणाम पर्यटनावर झालेला नाही. बजेट कमी असले तरीही नागरिक पर्यटनासाठी घराबाहेर पडत आहेत. कोरोनानंतर पर्यटनाला चांगली पसंती मिळत आहे.

           – नीलेश भन्साळी, संचालक, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ पुणे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news