CBSE Recruitment Scam: परीक्षा केंद्रात बोगस विद्यार्थ्याला अटक

शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरूद्ध चतुःशृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
CBSE Recruitment Scam 2026
CBSE Recruitment Scam 2026Pudhari
Published on
Updated on

पुणे : डायरेक्ट रिक्रुटमेंट कोटा एक्झामिनेशन २०२६ अंतर्गत ज्युनिअर अकाउटंट व ज्युनिअर असिस्टंट पदासाठी सीबीएसई बोर्डाने आयोजित केलेल्या परिक्षेत बोगस परीक्षार्थी आढळून आला आहे. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरूद्ध चतुःशृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

CBSE Recruitment Scam 2026
Education Scam : दिव्यांग बोगस शिक्षकांवर सीईओ यांची कारवाई

अमित कमलसिंग शर्मा (वय २५ रा. ता. सिधमुख, राजस्थान) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सुपरवायझरी हेडने फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सुपरवायझरी हेड असून, १ फेबु्रवारीला औंधमधील डी.ए.व्ही पब्लिक स्कुलमध्ये काम पाहत होते.

CBSE Recruitment Scam 2026
Teacher Recruitment Scam: शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीत गैरप्रकार केल्यास आता शाळा व्यवस्थापनावर कठोर कारवाई

त्यावेळी ज्युनिअर अकाउटंट व ज्युनिअर असिस्टंट पदासाठी सीबीएसई बोर्डाने आयोजित केलेल्या परीक्षेत आरोपी अमित शर्मा याच्याकडील ओळखपत्र संशयास्पद असल्याचे दिसून आले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर तो बोगस परिक्षार्थी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार संबंधिताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news