Pune Jilha Parishad President Selection: पुणे जिल्हा परिषदेत अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीची उत्सुकता; दोन नवीन वाहनांचा निर्णय

बहुमत मिळाल्यानंतर राष्ट्रवादीत हालचाली; पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांची रंगरंगोटी सुरू
Pune Jilha Parishad
Pune Jilha ParishadPudhari
Published on
Updated on

पुणे: जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर आता अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती कोण होणार? याकडे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, प्रशासनाच्या वतीने या सर्व पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांची रंगरंगोटी आणि डागडुजी केली जात असताना दोन नवीन वाहने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही जुनी वाहने सुस्थितीत असल्याने त्यांची किरकोळ दुरुस्ती करून ती वापरण्यात येणार आहेत.

Pune Jilha Parishad
Maharashtra CET MCA 2026 Registration: एमसीए व एमएचएमसीटी सीईटी नोंदणीस 23 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग््रेासने 73 पैकी 51 गटांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि चार विषयांच्या सभापतिपदांच्या निवडीसाठी राष्ट्रवादी काँग््रेास पक्षांतर्गत हालचाली सुरू झाल्या आहेत.

Pune Jilha Parishad
CBSE Class 10 Two Exam System: सीबीएसईची दहावीची पहिली परीक्षा सक्तीची; दुसऱ्यासाठी अनुपस्थितांना संधी नाही

पुढील काही दिवसांत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख राज्य सरकारचा ग््राामविकास विभाग घोषित करणार आहे. त्यापूर्वीच जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या कार्यालयांची रंगरंगोटी व डागडुजी सुरू करण्यात आली आहे.

Pune Jilha Parishad
Maharashtra SSC Exam 2026: राज्यात दहावीची परीक्षा उद्यापासुन सुरू; 16 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला

अध्यक्षांसाठी 2020 मध्ये नवीन टोयोटा इनोव्हा ही गाडी घेण्यात आली होती. मध्यंतरी प्रशासकीय राजवट असताना ही गाडी जि. प.चे सीईओ वापरत होते. ही गाडी सध्या सुस्थितीत असल्याने अध्यक्षांसाठी नवीन गाडी घेण्याची गरज नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Pune Jilha Parishad
Manchar Majhi Vasundhara Abhiyan 5.0 Award: ‘माझी वसुंधरा अभियान 5.0’मध्ये मंचर नगरपंचायतीला राज्यात प्रथम क्रमांक

सभापतींच्या गाड्या दिल्या होत्या बीडीओंना

तसेच, सभापतींसाठी असलेल्या काही गाड्या प्रशासकीय काळात बंद ठेवण्याऐवजी बीडीओंना दिल्या होत्या. त्यांपैकी दोन गाड्या सुस्थितीत आहेत. त्यामुळे दोन पदाधिकाऱ्यांसाठी बोलेरो गाड्या घेण्यात येणार असल्याचे जि. प. प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीपूर्वीच प्रशासनाने तयारी सुरू केल्याने जिल्हा परिषदेत नव्या कार्यकाळाची चाहूल लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news