Maharashtra CET MCA 2026 Registration: एमसीए व एमएचएमसीटी सीईटी नोंदणीस 23 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

महाराष्ट्र सीईटी सेलची घोषणा; एमसीए परीक्षा 30 मार्चला, एमएचएमसीटी 25 मार्चला
CET
CETPudhari
Published on
Updated on

पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे 2026 मध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (एमसीए) व मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (एमएचएमसीटी) या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश नोंदणीस 23 फेबुवारीपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती सीईटी सेलच्या वतीने देण्यात आली आहे.

CET
CBSE Class 10 Two Exam System: सीबीएसईची दहावीची पहिली परीक्षा सक्तीची; दुसऱ्यासाठी अनुपस्थितांना संधी नाही

एमसीए या अभ्यासक्रमास 50 हजार 961 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, तर एमएचएमसीटी या अभ्यासक्रमास 52 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. एमसीए या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा 30 मार्चला होणार आहे, तर एमएचएमसीटी या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा 25 मार्च रोजी होणार आहे. मागील वर्षी एमसीए सीईटीत 56 हजार 257 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर, एमएचएमसीटी सीईटीत80 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

CET
Maharashtra SSC Exam 2026: राज्यात दहावीची परीक्षा उद्यापासुन सुरू; 16 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला

या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज, नोंदणी वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांसाठीची सीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित पद्धतीने ऑनलाईन घेतल्या जातील.

CET
Manchar Majhi Vasundhara Abhiyan 5.0 Award: ‘माझी वसुंधरा अभियान 5.0’मध्ये मंचर नगरपंचायतीला राज्यात प्रथम क्रमांक

नोंदणीसाठी अपार आयडी व यूडीआयडी गरजेचे

यंदापासून विद्यार्थ्यांची अचूक माहिती उपलब्ध व्हावी, तसेच त्यांची पडताळणी करणे सहज शक्य व्हावे, यासाठी सीईटी सेलने सीईटी नोंदणीसाठी अपार आयडी व दिव्यांग विद्यार्थ्यांना युनिक डिसॲबिलिटी आयडी (यूडीआयडी) गरजेचे आहे. पण बंधनकारक नाही. विद्यार्थ्यांनी सीईटीमध्ये नोंदणी करताना अपार आयडी व यूडीआयडीची नोंदणी करावी. यावरून विद्यार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे.

CET
Someshwar Sugar Factory: सोमेश्वर साखर कारखान्याने 10 लाख टन गाळपाचा टप्पा पार

ज्या उमेदवारांनी अद्याप त्यांचा अपार आयडी तयार केलेला नाही त्यांनी तो डिजीलॉकरद्वारे तयार करावा. काही तांत्रिक कारणामुळे जर अपार आयडी व यूडीआयडी तयार न झालेल्या विद्यार्थ्यांनाही अपार आयडी व यूडीआयडीशिवाय सीईटीसाठी नोंदणी करता येईल. उमेदवारांनी पुढील अद्ययावत माहिती, तपशीलवार वेळापत्रक आणि परीक्षेशी संबंधित सूचनांसाठी नियमितपणे सीईटीसेलच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news