Pune Majhe Astitva Scheme: एकल महिलांसाठी ‘माझे अस्तित्व’ प्रकल्प; सक्षमीकरणाचा नवा मार्ग

1 लाख महिलांचा सहभाग; प्रशिक्षण, आर्थिक मदत आणि योजनांचा लाभ
Women Empowerment
Women EmpowermentPudhari
Published on
Updated on

पुणे: महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या संकल्पनेतून एकल महिलांसाठी ‌’माझे अस्तित्व‌’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) आनंद खंडागळे यांनी दिली आहे.

Women Empowerment
Pune RTE Admission Issues: आरटीई प्रवेशात गोंधळ; पडताळणीसाठी पालकांची धावपळ

या प्रकल्पासाठी ऑगस्ट 2025 मध्ये जिल्हा परिषदेमार्फत ग््राामीण भागातील एकल महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये 1 लाख 9 हजार महिलांना सहभाग नोंदविला. एकल महिलांसाठी महसूल मंडलनिहाय आयोजित एकूण 120 शिबिरात 70 हजार 558 एकल महिला सहभागी झाल्या होत्या. शासकीय योजनांसाठी आवश्यक कागदपत्रे मिळवून देणे, शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती व लाभ देणे, आरोग्य तपासणी करणे, आवश्यक आरोग्य सुविधा पुरविणे, संदर्भ सेवा देणे आदी सेवा देण्यात आल्या.

Women Empowerment
Pune Demolition Rules: पुण्यात इमारत पाडकामासाठी नवे कडक नियम; महापालिकेची नियमावली जाहीर

बंधन व आयटीसी एनजीओमार्फत शिरूर तालुक्यात एकल महिलांना आर्थिकदृष्ट्‌‍या सक्षम करण्याचे यशस्वी कामकाज केले आहे. आजअखेर 600 एकल महिलांना विविध प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. एकल महिलांना व्यवसायाच्या दृष्टीने आवश्यक साहित्य विनामूल्य पुरवण्यात आले. त्यामध्ये भाजीपाला, फळे विक्री, शिवणकाम यांसारख्या व्यवसायाचा समावेश आहे.

Women Empowerment
Pune Mula River Pollution: हिंजवडीत मुळा नदी प्रदूषणाचा गंभीर प्रश्न; नागरिकांचा संताप

प्रत्येक एकल महिलेला व्यवसायाबाबतचे सहा महिने प्रशिक्षण देण्यात आले आणि यशस्वी प्रशिक्षण पूर्ण केल्याबाबतचे प्रमाणपत्र व व्यवसाय सुरू करण्यासाठी कच्च्‌‍या मालाचा पुरवठा आदी बंधन व आयटीसी कंपनीच्या सीएसआर निधीतून देण्यात येत आहे. ‌‘माझे अस्तित्व‌’ योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात 3 ,बारामती 6, भोर 9, दौंड 16 , हवेली 9, इंदापूर 6, जुन्नर 7, खेड 15, मावळ 22, मुळशी 11, पुरंदर 8, शिरूर 5, आणि वेल्हे तालुक्यात 3 याप्रमाणे 120 शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Women Empowerment
Baramati Prostitution Racket: बारामतीत वेश्या व्यवसायाचा भांडाफोड! लॉजवर पोलिसांचा छापा

एकल महिलांसाठी पोर्टल तयार करणार

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, तसेच महिला बालकल्याण सभापती अंकिता पाटील यांच्या मार्गदर्शनात एकल महिला उपक्रम जिल्हा परिषदेमार्फत आता अधिक प्रभावीपणे राबवण्याचे नियोजन केलेले असून, याकरिता जिल्हा पातळीवर एकल महिलांसाठी पोर्टल तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी व पाठपुरावा करण्यात येणार आहे, अशी माहिती खंडागळे यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news