Pune RTE Admission Issues: आरटीई प्रवेशात गोंधळ; पडताळणीसाठी पालकांची धावपळ

मुदतवाढीची मागणी; कागदपत्र तपासणीतील विलंबामुळे पालक त्रस्त
RTE admission
RTE Admission Pudhari
Published on
Updated on

पुणे: उन्हाच्या तडाख्याने शरीराची काहिली होत असताना मुलांना आरटीईमार्फत इंग््राजी शाळांमध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पालकांना शिक्षण विभाग आणि इग््रांजी शाळांच्या नाकर्तेपणामुळे अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागत आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेतील कागदपत्रे पडताळणी आणि प्रत्यक्ष प्रवेश ही प्रक्रिया सुलभ आणि सुटसुटीत करून पालकांचे आर्थिक व मानसिक नुकसान टाळावे, अशी आग््राही मागणी पालकांनी केली आहे.

RTE admission
Pune Demolition Rules: पुण्यात इमारत पाडकामासाठी नवे कडक नियम; महापालिकेची नियमावली जाहीर

‌‘आरटीई‌’अंतर्गत राज्यातील 8 हजार 701 शाळांतील 1 लाख 14 हजार 285 जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत. या जागांसाठी 2 लाख 89 हजार 385 अर्ज दाखल झाले. त्यातून 1 लाख 5 हजार 229 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला आहे. तर 86 हजार 34 विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी आहे. 11 ते 20 एप्रिलदरम्यान संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करता येणार आहेत. आतापर्यंत राज्यात केवळ 4 हजार 482 विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

RTE admission
Pune Mula River Pollution: हिंजवडीत मुळा नदी प्रदूषणाचा गंभीर प्रश्न; नागरिकांचा संताप

सध्या काही कागदपत्रे पडताळणी केंद्रांवर गर्दी होते आहे. मुख्यत्वे पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी भागात पालक या पडताळणीसाठी रांगा लावून आणि दिवसाची मजुरी वाया घालून येत आहेत. कागदपत्रे पडताळणीची मुदत दहा दिवसांची आहे. त्यातील पाच दिवस शनिवार-रविवार व सणाचे सुटीचे असल्याने उर्वरित पाच दिवसांमध्ये ही प्रक्रिया कशी पूर्ण होणार, त्यामुळे यातून पालकांच्या मनामध्ये संभम आणि भीती निर्माण झालेली आहे. त्यातच पडताळणी समिती सदस्य कागदपत्र मिळाल्याचे पोहोच रिसीट देत नाहीत.

RTE admission
Baramati Prostitution Racket: बारामतीत वेश्या व्यवसायाचा भांडाफोड! लॉजवर पोलिसांचा छापा

त्यामुळे शासनाने तातडीने ही मुदत वाढवायला हवी. काही शाळा त्यांच्या पूर्ण फीपैकी शासन प्रतिपूर्ती रक्कम साडेसतरा हजार वजा करून इतर फी भरावी लागेल असे पालकांना धमकावत आहेत. कायद्यानुसार मुलांना मोफत शिक्षण व मोफत शैक्षणिक साहित्य गणवेश द्यायचा आहे. शासनाने काय काय सुविधा मोफत आहेत याचे स्पष्टीकरण देणे गरजेचे असल्याचे देखील पालकांनी स्पष्ट केले आहे.

RTE admission
Pune Heatwave Impact: पुण्यात 40 अंशांचा कहर! पाणीसाठे आटले, बाजारपेठा ओस

आरटीई प्रवेशासाठी मुदतवाढ देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी खोटे भाडेकरार आणि खोटी गुगल लोकेशन टाकून अर्ज भरल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे पडताळणी समितीने भाडेकराराच्या तांत्रिक मुद्द्‌‍यांपेक्षाही प्रत्यक्षात पालक तिथे राहतात का हे तपासणे गरजेचे आहे. तसेच प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडण्यासाठी वेगाने पावले उचलणे गरजेचे आहे.

मुकुंद किर्दत, आप पालक युनियन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news