

शिक्रापूर: पुणे जिल्हा परिषदेने शिक्षण क्षेत्राला दिलेल्या विशेष प्राधान्यामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. निपुण भारत उपक्रम सॅक ॲक्रीडेशन, तसेच चौथी, पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पुणे जिल्ह्याने महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी माहिती दिली.
शिरूर तालुक्यातील मॉडेल स्कूल व प्रस्तावित मॉडेल स्कूलच्या ?शुक्रवारी (दि. 22) पाहणी दौऱ्यात ते बोलत होते. शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा, सणसवाडी, कासारी, शिक्रापूर परिसर व कान्हूर मेसाई गावांतील तब्बल दहा शाळांची त्यांनी पाहणी केली. या वेळी त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुरू असलेल्या नावीन्यपूर्ण प्रयोगांचे कौतुक केले. तसेच प्रस्तावित शाळांच्या जागांची निश्चिती करून त्याही लवकरच कार्यान्वित करण्याचे आदेश त्यांनी संबंधित विभागाला दिले.
पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने गेल्या काही काळापासून जाणीवपूर्वक शैक्षणिक गुणवत्तेवर भर दिला जात आहे. आम्ही केवळ भौतिक सुविधांवर लक्ष न देता विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमतेवर काम केले, ज्याचा सकारात्मक परिणाम आज दिसत आहे, असे पाटील यांनी नमूद केले. जिल्ह्याने केवळ शिष्यवृत्तीतच नव्हे, तर ’निपुण भारत’च्या निकषांमध्येही आघाडी घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या वेळी त्यांच्या सोबत सीनियर कमांडट सीआयएसएफ पुणे एअरपोर्ट प्रताप पुंडे, जि. प. सदस्य मोनिका हरगुडे, उपसभापती रामराव सासवडे, पं. स सदस्य कोमल ढेरंगे, गट विकास अधिकारी महेश डोके, तहसीलदार बाळासाहेब मस्के, पंचायत समितीचे प्रशासकीय अधिकारी, संबंधित गावातील सरपंच, उपसरपंच आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील तब्बल 5,600 विद्यार्थी आता जर्मन, स्पॅनिश, फेंच आणि जापनीज यांसारख्या जागतिक भाषा आत्मसात करून त्या अस्खलितपणे बोलत आहेत. ?ग््राामीण भागातील शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी ’मॉडेल स्कूल’ची निर्मिती केली जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी जिल्हा परिषद आता ’रूम टू रीड’ ही विशेष संकल्पना राबवणार आहे.
गजानन पाटील, सीईओ, पुणे जिल्हा परिषद