Pune Water Restrictions: पुण्यात पिण्याच्या पाण्याच्या गैरवापरावर कठोर कारवाई; नियमभंगास ₹10 हजार दंड

कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे निर्बंध; वाहन धुणे, स्विमिंग पूल आणि वॉशिंग सेंटरसाठी पिण्याच्या पाण्याला बंदी
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पुणे: भारतीय हवामान विभागाने यंदा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी पुणे महापालिकेने कठोर पावले उचलली आहेत. महापालिका हद्दीत पिण्याच्या पाण्याचा गैरवापर रोखण्यासाठी विविध निर्बंध लागू करण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

Pune Municipal Corporation
Cobra Bite Survival: नागदंशानंतर अडीच वर्षांच्या आर्याचा मृत्यूवर मात; डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश

वारंवार नियमभंग केल्यास संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचाही इशारा प्रशासनाने दिला आहे. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी हे आदेश दिले आहेत.

Pune Municipal Corporation
Maharashtra RTI Rules 2026: माहिती अधिकार नियमांवरील नव्या निर्बंधांमुळे नागरिकांच्या अधिकारांवर गदा?

या आदेशानुसार, सार्वजनिक व खासगी वॉशिंग सेंटर पाणी कपातीच्या काळात बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, तसेच सार्वजनिक आणि खासगी स्विमिंग पूल तसेच खासगी उद्यानांसाठी पिण्याचे पाणी वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. वाहन धुणे, पदपथ आणि अंगण स्वच्छ करण्यासाठीही पिण्याचे पाणी वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.

Pune Municipal Corporation
Palakhi Route Road Safety Issue: काटेवाडी पालखी मार्गावरील अपूर्ण कामांमुळे वारकऱ्यांच्या सुरक्षेला धोका

खासगी गृहनिर्माण संस्थांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यान्वित करून त्यातील पाण्याचा वापर बागकाम व फ्लशिंगसाठी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पाण्याच्या टाक्या ओव्हर फ्लो होऊ नयेत, यासाठी ऑटोमॅटिक फ्लोट व्हॉल्व्ह बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, टाकी ओव्हरफ्लो झाल्यास १० हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.

Pune Municipal Corporation
Guar Crop Price Crisis: मंचर गवार उत्पादक संकटात; कमी बाजारभावामुळे शेतकऱ्यांचा नफा घटला

बांधकामे आणि रस्त्यांच्या कामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. अशा कामांसाठी केवळ एसटीपी, विहीर किंवा बोअरवेलचे पाणी वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित बांधकाम तातडीने बंद करून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news