Munitions India Limited CBI Case: पुण्यात संरक्षण कंपनीच्या अधिकाऱ्याविरुद्ध सीबीआयचा गुन्हा; ५०० कोटींच्या दारूगोळा कंत्राटात लाचखोरीचा संशय

म्युनिशन्स इंडिया लिमिटेडचे कार्यकारी संचालक अनिल कुमार यांच्यासह सहा जणांवर आरोप; पुण्यासह चार शहरांत छापे, निवासस्थानी कोट्यवधींची रोकड जप्त
CBI
CBIPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

महेंद्र कांबळे

पुणे: देशाच्या संरक्षणासाठी लागणाऱ्या दारूगोळ्याच्या खरेदी-विक्रीशी संबंधित यंत्रणेतच कथित लाचखोरी आणि गोपनीय माहितीच्या गळतीचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पुण्यातील म्युनिशन्स इंडिया लिमिटेड (एमआयएल) या सरकारी संरक्षण कंपनीचे कार्यकारी संचालक अनिल कुमार यांच्यासह सहा जणांविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. सुमारे ५०० कोटी रुपयांच्या दारूगोळा पुरवठा कंत्राटाच्या अनुषंगाने लष्करी खरेदीशी संबंधित संवेदनशील माहिती खासगी कंपनीला पुरवल्याचा आणि त्याबदल्यात लाचखोरी झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामुळे संरक्षणाच्या तिजोरीलाच खाबुगिरीचा सुरुंग लागल्‍याचे समोर आले आहे.

CBI
Pune Dengue Cases: पुण्यात डेंग्यूचा उद्रेक कायम; चार महिन्यांत १,६४३ रुग्ण, महापालिकेची अधिकाऱ्यांना नोटीस

व्यवहाराशी संबंधित संरक्षण क्षेत्रातील संवेदनशील माहिती बाहेर पुरवण्यात आली का, याचाही शोध घेतला जात आहे. सीबीआयने पुणे, म्हैसूर, बंगळुरू आणि दिल्ली येथे संशयितांच्या संबंधित ठिकाणांवर छापे टाकले. पुण्यात अनिल कुमार यांच्या निवासस्थानी केलेल्या कारवाईत कोट्यवधींची रक्‍कम सीबीआयच्‍या हाती लागली आहे. याशिवाय महत्त्वाची कागदपत्रेही तपास यंत्रणेच्या हाती लागली आहेत. जप्त रोकडीचा स्रोत, तिचा लाच व्यवहारांशी असलेला संबंध आणि आर्थिक देवाणघेवाणीच्या साखळीचा शोध घेतला जात आहे. अवैध रक्कम चेतनाश्री (अनिल कुमार यांच्या पत्नी) , भाऊ बी. हर्षवर्धन आणि अन्य नातेवाइकांच्या माध्यमातून लपवून ठेवल्याचा संशय सीबीआयने व्यक्त केला आहे. या व्यवहारांत नातेवाइकांची नेमकी भूमिका काय होती, याची चौकशी सुरू आहे. तसेच, कथित व्यवहारांमध्ये मध्यस्थ किंवा अंगाडिया नेटवर्कचा सहभाग होता का, याचाही तपास केला जात आहे.

CBI
Pune Drinking Water Safety: पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर; महापौरांना वॉटर प्युरिफायर भेट देत राष्ट्रवादीचे आंदोलन

संरक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेचा प्रश्न

सरकारी कंत्राटे मिळवून देण्यासाठी अधिकारांचा गैरवापर झाला का, संवेदनशील माहिती कोणापर्यंत पोहोचली आणि या प्रकरणात आणखी अधिकारी किंवा खासगी व्यक्ती सहभागी आहेत का, हे तपासातील महत्त्वाच्‍या बाबी ठरणार आहेत. आरोपींच्या कोठडीतील चौकशीतून आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे उलगडण्याची शक्यता आहे.

CBI
Pune Property Tax Correction: पुणे महापालिकेचा मोठा निर्णय; खासगी जागेचा ताबा घेतल्यानंतर १५ दिवसांत मिळकतकरात होणार दुरुस्ती

गोपनीय माहितीच्या बदल्यात कंत्राटाचा खेळ?

सीबीआयच्या आरोपांनुसार, एमआयएलमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या अनिल कुमार यांनी आपल्या पदाचा कथित गैरवापर करून संरक्षणविषयक संवेदनशील माहिती खासगी कंपनीपर्यंत पोहोचवली. या माहितीचा वापर ५०० कोटी रुपयांचा दारूगोळा पुरवठा कंत्राट मिळवण्यासाठी करण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणेने व्यक्त केला आहे. संरक्षण खरेदीशी संबंधित माहितीचा असा कथित गैरवापर झाला असल्यास, तो केवळ भ्रष्टाचाराचा नव्हे, तर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही गंभीर विषय मानला जात आहे.

CBI
Smita Jadhav: पुणे पदवीधर मतदारसंघात डॉ. स्मिताताई जाधव यांना मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांचा पाठिंबा

गुन्ह्यातील सहा आरोपी आणि आरोप

  • अनिल कुमार (कार्यकारी संचालक, एमआयएल) : गोपनीय माहिती पुरवल्याचा आणि लाचखोरीत सहभागी असल्याचा आरोप

  • आशिष कंसल (सीईओ, एसएमपीपी लिमिटेड) : ५०० कोटींचे कंत्राट मिळवण्यासाठी लाच दिल्याचा आरोप.

  • रवित कुमार तेवतिया (एसएमपीपी कर्मचारी) : दोघांमध्ये मध्यस्थी केल्याचा आरोप.

  • बी. हर्षवर्धन (अनिल कुमार यांचे भाऊ) : लाचेची रक्कम लपवण्यात सहभाग असल्याचा संशय.

  • चेतनाश्री (अनिल कुमार यांच्या पत्नी) : कथित गैरव्यवहारातील रक्कम किंवा मालमत्ता लपवण्यास मदत केल्याचा आरोप.

  • एसएमपीपी लिमिटेड (खासगी कंपनी) : कंत्राटासाठी कथित लाचखोरीच्या व्यवहारात सहभाग असल्याचा आरोप.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news